नितीन नबीन यांना बिहारमधून उमेदवारी; राज्यसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर Photo : X (Nitin Nabin)
राष्ट्रीय

नितीन नबीन यांना बिहारमधून उमेदवारी; राज्यसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

राज्यसभेच्या ३७ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून भाजपने आपल्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना बिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : राज्यसभेच्या ३७ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून भाजपने आपल्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना बिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सात जागांसाठी निवडणूक होणार असून अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही.

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत नितीन नवीन, शिवेश कुमार (बिहार), तेराश गोवाला, जोगेन मोहन (आसाम), लक्ष्मी वर्मा (छत्तीसगड), संजय भाटिया (हरयाणा), मनमोहन सामल, सुजीत कुमार (ओदिशा) आणि राहुल सिन्हा (पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे.

३७ जागांसाठी निवडणूक

राज्यसभा निवडणुकीसाठी १६ मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या ३७ जागांपैकी सर्वाधिक ७ जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. तमिळनाडूतून ६, बिहार आणि पश्चिम बंगालमधून ५ आणि ओदिशातून ४, आसामधून ३, तेलंगणातून २ आणि छत्तीसगड, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग