राष्ट्रीय

कोलकात्यातील परकियांचे पुतळे काढणार भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान : इंडियाचे नाव भारतच करणार

जगभरातील नेते भारतात हजर असल्यामुळे नाव बदलण्याची हीच योग्य वेळ आहे

नवशक्ती Web Desk

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते दिलीप घोष यांनी इंडियाचे नामकरण भारत असेच करण्यात येणार आहे. तसेच कोलकाता शहरातील परकियांचे पुतळे देखील काढून टाकण्यात येतील. ज्यांना या नावाला विरोध आहे ते देश सोडू शकतात, असे आक्रमक विधान करून या नावाला विरोध करणाऱ्यांना जणू आव्हानच दिले आहे.

दिलीप घोष हे मेदिनापूर येथील भाजपचे खासदार आहेत. ते खरगपूर येथे चाय पे चर्चा कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आमचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही कोलकातामधील परकियांचे सर्व पुतळे काढून टाकणार आहोत. तसेच प. बंगालमधील आणखी एक भाजप नेते राहुल सिन्हा यांनी एका देशाची दोन नावे असूच शकत नाहीत. आता जगभरातील नेते भारतात हजर असल्यामुळे नाव बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. भाजप नेत्यांच्या या आव्हानाला उत्तर देताना तृणमूल काँग्रेस प्रवक्ता शांतनू सेन यांनी भाजप इंडिया आघाडीला घाबरली असून खऱ्या मुद्यांवरून जनतेचे लक्ष भ्रमित करण्यासाठी यांनी भारत नावाचा नवा मुद्दा उपस्थित केला असल्याचा आरोप केला आहे.

Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

CSMT स्थानकातील प्लॅटफॉर्म १८ राहणार बंद; पुनर्विकासासाठी ८० दिवस फलाट बंद; दोन एक्स्प्रेस दादरपर्यंतच चालणार

Maharashtra Heavy Rain : ठाणे, रायगडसाठी 'रेड अलर्ट'