राष्ट्रीय

भाजपची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर ; महाराष्ट्रातील 'या' नेत्यांना पुन्हा संधी

ही यादी पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे प्रभारी अरुण सिंह यांनी सकाळी जाहीर केली

नवशक्ती Web Desk

भाजपच्या संघटनात्मक पुनर्रचनेत आज राष्ट्रीय कार्यकारणीच्या नवी केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. यात नऊ महिला आणि दोन मुस्लीम नेत्यांचा समावेश आहे. ही यादी पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे प्रभारी अरुण सिंह यांनी सकाळी जाहीर केली. या यादीत १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस, सह-संघटन महासचिव, १३ राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि सह-खजिनदार अशी रचना आहे.

भारतीय जनता पक्षाच्या या कार्यकारणीत महाराष्ट्रील तिघांना पुन्हा स्थान देण्यात आलं आहे. त्यात विनोद तावडे यांना महामंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे आणि विजया राहाटकर यांच्यावर राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी २ महिने राजकारणापासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना पुन्हा सक्रिय होण्यास सांगितलं होतं. यानंतर आता भाजपने पंकजा यांच्या पुन्हा केंद्रीय पातळीवरची जबाबदारी टाकली आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?