राष्ट्रीय

अंध भारतीय महिलेने केले एव्हरेस्ट सर

जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम भारताच्या अंध महिला गिर्यारोहकाने केला आहे. विशेष म्हणजे छोनझीन अनाग्मो ही महिला आदिवासी असून ती हिमाचल प्रदेशच्या किन्नूर जिल्ह्यात राहते.

Swapnil S

सिमला : जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम भारताच्या अंध महिला गिर्यारोहकाने केला आहे. विशेष म्हणजे छोनझीन अनाग्मो ही महिला आदिवासी असून ती हिमाचल प्रदेशच्या किन्नूर जिल्ह्यात राहते.

हेलन केल्लर हिचा आदर्श ठेवून छोनझीन अनाग्मो हिने एव्हरेस्ट सर करण्याचा चंग बांधला होता. एव्हरेस्ट सर करणारी अनाग्मो ही भारतातील पहिली अंध महिला गिर्यारोहक ठरली, तर जगातील ती पाचवी महिला ठरली.

भारत-तिबेट सीमावर्ती भागात हिमाचल प्रदेशच्या चांगो गावात तिचा जन्म झाला. वयाच्या ८ व्या वर्षी तिची दृष्टी गेली. तरीही हार न मानता दिल्लीच्या विद्यापीठातून तिने पदवी व पदव्युत्तर पदवी घेतली. सध्या ती युनियन बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर सेवा असोसिएट म्हणून काम करते. छोनझीन अनाग्मोचे वडील अमर चांद म्हणाले की, माझ्या मुलीने अभिमानास्पद कामगिरी केली. आम्ही तिच्या परतण्याची वाट पाहत आहोत.

अनाग्मोने एव्हरेस्ट सर केल्याची बातमी कळताच गावात आनंद पसरला आहे. अनाग्मोचा प्रवास हा आव्हानांनी भरलेला होता, मात्र तिने प्रत्येक आव्हानाचे रूपांतर संधीत केले. तिने यापूर्वी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ''अंधत्व हा माझा कमकुवतपणा नाही, तर माझी ताकद आहे. शिखर सर करणे हे माझे बालपणापासूनचे स्वप्न होते. पण, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. आता सर्व अडचणी मी दूर केल्या आहेत.''

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल