राष्ट्रीय

‘अमूल’ला जगात पहिल्या स्थानावर आणावे; जीसीएमएमएफच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त पंतप्रधानांचे आवाहन

अमूल ही जगातील आठव्या क्रमांकाची सर्वात मोठी अशी डेअरी क्षेत्रातील कंपनी आहे. तुम्हा सर्वांना ती जगातील सर्वात मोठी डेअरी कंपनी बनवण्याची गरज आहे.

Swapnil S

अहमदाबाद : 'अमूल' ब्रँडची मालकी असलेल्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनला ( जीसीएमएमएफ) जगातील आठव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर आणावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शेतकरी आणि सहकारी क्षेत्राशी संबंधित इतर भागधारकांना केले.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या (जीसीएमएमएफ) च्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यासाठी अहमदाबादच्या मोटेरा भागातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर जमलेल्या सुमारे एक लाख लोकांना सभेत ते बोलत होते. भारताच्या भरभराटीच्या डेअरी क्षेत्राचा आढावा घेताना मोदी म्हणाले की, ते वार्षिक ६ टक्के दराने वाढत आहे तर जागतिक दुग्ध क्षेत्र २ टक्क्यांनी वाढत आहे.

सध्या, अमूल ही जगातील आठव्या क्रमांकाची सर्वात मोठी अशी डेअरी क्षेत्रातील कंपनी आहे. तुम्हा सर्वांना ती जगातील सर्वात मोठी डेअरी कंपनी बनवण्याची गरज आहे. या प्रयत्नात माझे सरकार तुमच्यासोबत आहे आणि ही मोदींची हमी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्यासोबत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील उपस्थित होते. मोदी यांनी यावेळी सांगितले की, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणून अमूलची स्थापना झाली आणि नंतर जीसीएमएमएफ अस्तित्वात आली. हे एक उदाहरण असून जे सहकार क्षेत्र आणि सरकार एकत्र कसे काम करू शकतात हे दाखवते. त्या उदाहरणामुळे भारत आज जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला आहे, असे मोदी म्हणाले. दहा वर्षांत, भारताची दरडोई दुधाची उपलब्धता ४० टक्क्यांनी वाढली आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव