राष्ट्रीय

सियाचेनमध्ये बंकरला आग

एक जवान शहीद, तीन जखमी

नवशक्ती Web Desk

सियाचिन : सियाचिन ग्लेशियर येथे लष्कराच्या बंकरला आग लागली. त्यात एक अधिकारी शहीद झाला असून, तीन जवान जखमी झाले आहेत.

भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी ३.३० वाजता ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे आम्ही एका वैद्यकीय अधिकारी कॅप्टन अंशुमन सिंह यांना गमावले आहे, तर वाचवलेल्या तिघांवर चंदीगढ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही दुर्घटना सालटोरो भागात घडली. येथे दारुगोळा असलेल्या बंकरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. त्यानंतर ती अनेक तंबूत पसरली. जखमी जवानांची ओळख अजूनही पटलेली नाही.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस