राष्ट्रीय

Adani : अदाणींनी सांगितलं एफपीओ मागे घेण्यामागचं कारण; म्हणाले...

शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर अदानी (Adani) समूहाने तब्बल २० हजार कोटींचा एफपीओ (FPO) मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला

प्रतिनिधी

गौतम अदानी (Guatam Adani) आणि अदानी समूह (Adani Group) सध्या मोठ्या संकटात असल्याचे दिसून येत आहे. अदानी समूहासोबत झालेल्या मोठ्या वादानंतर त्यांचे शेअर्स तब्बल २८ टक्क्यांनी घसरले होते. यानंतर अदानी समूहाने तब्बल २० हजार कोटींचा एफपीओ (FPO) मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला.

यासोबतच एफपीओ खरेदीचे सर्व पैसे गुंतवणूकारांना परत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना, यामागचे कारण स्पष्ट केले आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी केला असून त्यामध्ये ते म्हणाले की, "आमची बॅलन्सशीट मजबूत स्थितीमध्ये आहे. गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये, यासाठी हा एफपीओ मागे घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे." असे त्यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओमध्ये गौतम अदानी म्हणाले की, "आमचे एफपीओ पूर्णपणे विक्री झाल्यानंतर बुधवारी आम्ही ते एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांना धक्का बसला असेल. पण बुधवारी शेअर बाजारामध्ये निर्माण झालेली अस्थिरता बघता आमच्या बोर्डाला वाटले की, या एफपीओचे व्यवहार अशाच प्रकारे सुरू ठेवले तर ते नैतिकतेला धरून राहणार नाही. गेल्या ४० वर्षांच्या प्रवासामध्ये मला सर्वच भागधारकांचा चांगला पाठिंबा मिळाला आहे. खासकरून गुंतवणूकदारांनी मला पाठिंबा दिला आहे. मी आयुष्यात जे काही मिळवले, ते त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच. माझ्या यशामागे त्यांचा मोठा वाटा आहे. माझ्यासाठी माझ्या गुंतवणूकदारांचे हित हे सर्वात महत्त्वाचे आहे. बाकी इतर सर्व दुय्यम आहे." असे स्पष्टीकरण दिले.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता