CBSE 10th, 12th Exam Date: सीबीएसईच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या महत्त्वाची माहिती प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

CBSE 10th, 12th Exam Date: सीबीएसईच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी इयत्ता १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी इयत्ता १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले असून त्या वेळापत्रकानुसार, इयत्ता १०वीची बोर्ड परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ ते ९ मार्च २०२७ या कालावधीत पार पडणार आहे, तर इयत्ता १२वीची बोर्ड परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होऊन ९ एप्रिल २०२७ रोजी समाप्त होईल.

यापूर्वी बोर्डाने १०वी आणि १२वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या तारखांची घोषणा केली होती. भारतातील व परदेशातील सर्व संलग्न शाळांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारी २०२७ ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत आयोजित केल्या जातील. तसेच, बर्फाच्छादित आणि हिवाळी सत्रातील शाळांसाठी इयत्ता १०वी आणि १२वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा ९ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२६ या कालावधीत पार पडतील.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अजित पवार गटात दिवाळीनंतर धमाका? ज्येष्ठ नेते बंडाच्या पवित्र्यात, शरद पवार गटही भाजपसोबत जाण्याची शक्यता

वगळलेल्या मतदारांना पुन्हा संधी; महाराष्ट्रासह ७ राज्यांबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय

‘गोकुळा’त घमासान सुरूच; नामनिर्देशित पाच संचालक नेमण्याचा मार्ग मोकळा, सहकार कायद्यातील दुरुस्तीचा अध्यादेश जारी

मतचोरीच नव्हे; तर हक्कचोरी; आधार कार्ड नव्हे, मतदार ओळखपत्र महत्त्वाचे? मोदी सरकारची घोषणा म्हणजे मोठे कटकारस्थान - राहुल गांधी

महर्षी फाऊंडेशनला जमीन देण्याचा निर्णय रद्द; उच्च न्यायालयाचा महायुती सरकारला दणका, टाटा कंपनीसोबतचा वीजनिर्मिती करार वाऱ्यावर