राष्ट्रीय

घरातील सदस्यांच्या संमतीविना सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गोपनीयतेचा भंग; सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय

घरातील निवासी भागामध्ये कुटुंबातील अन्य सदस्यांच्या संमतीशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे हे त्यांच्या गोपनीयतेच्या आणि संपत्तीच्या अधिकाराचे उल्लंघन ठरते...

Swapnil S

नवी दिल्ली : घरातील निवासी भागामध्ये कुटुंबातील अन्य सदस्यांच्या संमतीशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे हे त्यांच्या गोपनीयतेच्या आणि संपत्तीच्या अधिकाराचे उल्लंघन ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मनमोहन यांच्या खंडपीठाने दिला.

एका इमारतीत सीसीटीव्ही लावण्यावरून दोन भावांमध्ये वाद झाला. सुरुवातीला हा वाद उच्च न्यायालयात तर नंतर सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने घरात सीसीटीव्ही लावता येतो का, याबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

दोन भावांमध्ये वाद

सदर याचिका दोन भावांतील संपत्तीविषयक वादातून उद्भवली होती. एक भाऊ इंद्रनील मल्लिक यांनी त्यांच्या संयुक्त मालकीच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. त्यांनी यासाठी कारण दिले की, घरात मौल्यवान वस्तू, दुर्मिळ संग्रह आणि प्राचीन कलाकृती असल्याने त्यांची सुरक्षा करणे आवश्यक आहे. मात्र, दुसऱ्या भावाने, शुभेन्द्र मल्लिक यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आणि न्यायालयात दाद मागितली.

कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना सांगितले की, सहवासीयांच्या संमतीशिवाय अशा प्रकारे सीसीटीव्ही बसवणे हे त्यांच्या वैयक्तिक गोपनीयतेचा आणि संपत्तीचा आनंद घेण्याच्या अधिकाराचा भंग करतो. न्या. सब्यसाची भट्टाचार्य आणि न्या. उदय कुमार यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या “न्या. के. एस. पुत्तुस्वामी विरुद्ध भारत सरकार या ऐतिहासिक निर्णयाचा दाखला दिला.

विशेष अनुमती याचिका

गोपनीयतेचा अधिकार हा अनुच्छेद २१ अंतर्गत मूलभूत अधिकार आहे आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, स्वायत्तता आणि ओळख ही पायाभूत तत्वे आहेत, जी कोणत्याही परिस्थितीत भंग करता येणार नाहीत. त्यामुळे न्यायालयाने घरातील निवासी भागात बसवलेले ५ सीसीटीव्ही कॅमेरे हटवण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरुद्ध इंद्रनील मल्लिक यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच निर्णय योग्य असून यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही, असे सांगत याचिका फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केले की, घराच्या निवासी भागात सहवासीयांच्या संमतीशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे हे त्यांच्या गोपनीयतेच्या आणि संपत्तीच्या अधिकाराचे उल्लंघन ठरते, असे न्या. दत्ता आणि न्या. मनमोहन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...