खादी वस्तू आपल्याला मोफत किंवा स्वस्तात मिळते म्हटल्यावर सर्वजण तेथे धावतात. वाराणसी जिल्ह्यात स्वस्तात टॅटू बनवणे १२ जणांच्या जीवाशी आले आहे. एकाच सुईने टॅटू बनवल्याने १२ जणांना ‘एचआयव्ही’ची बाधा झाल्याने खळबळ माजली आहे. यात १० मुलगे व दोन मुलींचा समावेश आहे. या सर्व ‘एचआयव्ही’ग्रस्त तरुणांची तपासणी पं. दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात करण्यात आली आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, एका सुईने टॅटू काढल्याने सर्वजण ‘एचआयव्ही’ संक्रमित झाले. यातील सर्व जणांनी काही दिवसांपूर्वी टॅटू काढला होता. तो काढल्यानंतर त्यांना सतत ताप व कमजोरपणा जाणवत होता. सामान्य औषधे घेऊनही त्यांना आराम मिळत नव्हता. तसेच त्यांचे वजनही मोठ्या प्रमाणात कमी होताना आढळले. या लक्षणानंतर त्यांची रक्तचाचणी केल्यानंतर ते ‘एचआयव्ही’ पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले.