जनमनातील शंका दूर कराव्या - चिराग पासवान 'पीटीआय'च्या व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
राष्ट्रीय

जनमनातील शंका दूर कराव्या - चिराग पासवान

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या अहवालावरून जनतेच्या मनात निर्माण झालेले गैरसमज निवडणूक आयोगाने दूर करावेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी शुक्रवारी केले.

Swapnil S

पाटणा : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या अहवालावरून जनतेच्या मनात निर्माण झालेले गैरसमज निवडणूक आयोगाने दूर करावेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी शुक्रवारी केले. एनडीएतील एक प्रमुख घटक पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री असलेल्या चिराग पासवान यांनी सर्वप्रथम या प्रकरणाबाबत भाष्य केल्याने अन्य घटक पक्ष कोणती भूमिका घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“सरकारचा एक भाग म्हणून एका घटनात्मक संस्थेचा बचाव करण्याचा माझा कोणताही हेतू नाही. तसेच विरोधी पक्षातील नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर मी फारसा भर देत नाही, कारण विरोधी पक्ष नेहमीच राजकीय फायद्याची भूमिका घेतात. लोकांचा जर निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास उडू लागला, तर ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरेल. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपले स्पष्टीकरण अधिक ठामपणे समोर मांडले पाहिजे. सर्वसामान्य जनतेच्या मनातील भ्रम आणि शंका त्यांनी नक्कीच दूर केल्या पाहिजेत,” असे पासवान म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ज्ञानेश कुमारांचा पाय आणखी खोलात; सीईसींच्या निर्णयांना सुप्रीम कोर्टात आव्हान, २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्तांनी २४ तासांत राजीनामा द्यावा - सीजेपी

आजचे राशिभविष्य, २६ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

कुरकुरीत कोबी पराठा बनवायचाय? 'या' ५ टिप्स ठेवा लक्षात

Mumbai : मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक