CJP ची दिल्लीत उद्या तिरंगा रॅली; सरकार देशात अघोषित आणीबाणी लादतंय - अभिजित दीपकेंचा आरोप  X | संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

CJP ची दिल्लीत उद्या तिरंगा रॅली; सरकार देशात अघोषित आणीबाणी लादतंय - अभिजित दीपकेंचा आरोप

जे लोक दिल्लीत येऊ शकत नाहीत, त्यांनी संध्याकाळी आपापल्या शहरांमध्ये तिरंगा मार्च काढावा आणि तिरंगा हा आपला अभिमान आहे, हे दाखवून द्यावे

Swapnil S

नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी बुधवारी "देशभक्तांना" दिल्लीचे व्यावसायिक केंद्र असलेल्या कनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्क येथे राष्ट्रध्वजासह शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी एकत्र जमण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार देशात अघोषित आणीबाणी लादत असल्याचा आरोप 'कॉक्रोच जनता पार्टी'चे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी बुधवारी केला.

तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही, हे आपण दाखवून देऊ, असे दीपके यांनी 'एक्स'वर म्हटले आहे. तसेच, जे लोक दिल्लीत येऊ शकत नाहीत, त्यांनी आपापल्या शहरांमध्ये 'तिरंगा मार्च' काढण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्यालाही अटक केली जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

"तुम्हाला माहीत आहेच की, सौरव आणि आशुतोष यांना केवळ तिरंगा फडकवल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आले आहे. तिरंग्यावर प्रेम करणाऱ्या सर्व देशभक्तांना मी विनंती करतो की त्यांनी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रध्वजासह कनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्क येथे यावे, तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही, हे आपण दाखवून देऊ, असे ते म्हणाले.

जे लोक दिल्लीत येऊ शकत नाहीत, त्यांनी संध्याकाळी आपापल्या शहरांमध्ये तिरंगा मार्च काढावा आणि तिरंगा हा आपला अभिमान आहे, हे दाखवून द्यावे, या वादानंतर मलाही अटक केली जाऊ शकते, पण मला त्याची भीती वाटत नाही. तिरंगा हा माझा अभिमान आहे आणि मी तो उंचावत राहीन, असे ते म्हणाले.

सौरव दास, आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) या युवा संघटनेच्या नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पक्षाचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना खासगी मालमत्तेत घुसखोरी करून जंतरमंतर या निर्बंधित निदर्शन स्थळी पोहोचल्याप्रकरणी आणि शांतता टिकवून ठेवण्याचे बंधपत्र (बॉण्डस्) मोडल्याप्रकरणी बुधवारी पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. तर त्यांचा आणखी एक सहकारी अजिंक्य शिंदे याला सहा महिने शांतता आणि चांगले वर्तन राखण्याच्या अटीवर वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि ५,००० रुपयांच्या हमीवर सोडून देण्यात आले आहे.

दिवाळीभेट! शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस

दिव्यांगाना जन्मापासून पेन्शन; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

विद्यार्थी आंदोलनाच्या आड येऊ नका - राहुल गांधी

महागाईचा आगडोंब! सप्टेंबरमध्ये नवीन मालिकेतील चलनवाढीचा उच्चांकी दर