व्यावसायिक सिलिंडरच्या किमती १९५ रु. ने वाढल्या; घरगुती गॅसच्या दरात बदल नाही 
राष्ट्रीय

व्यावसायिक सिलिंडरच्या किमती १९५ रु. ने वाढल्या; घरगुती गॅसच्या दरात बदल नाही

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सरकारी कंपन्यांनी बुधवारी व्यावसायिक एलपीजीच्या दरात १९५.५० रुपयांची वाढ केली.

Swapnil S

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सरकारी कंपन्यांनी बुधवारी व्यावसायिक एलपीजीच्या दरात १९५.५० रुपयांची वाढ केली. ही दरवाढ १९ किलोच्या सिलिंडर्सना लागू आहे. तथापि, सरकारी कंपन्यांनी घरगुती सिलिंडर्सच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचे दर 'जैसे थे'च आहेत. पश्चिम आशियामध्ये अधिकच गडद होत चाललेल्या संकटाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किमती वाढवल्या आहेत.

पश्चिम आशियामध्ये तीव्र होत असलेल्या संघर्षामुळे या किमती वाढल्या आहेत. नवीन दर लागू झाल्यानंतर, दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडराची किंमत आता २,०७८.५० रुपये इतकी झाली आहे. यापूर्वी, 1 मार्च रोजी सरकारी तेल कंपन्यांनी १९ किलोच्या सिलिंडरची किंमत ११४.५० रुपयांनी वाढवली होती.

जेट इंधनाचे दरही वधारले, विमान प्रवास महागणार?

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता विमान वाहतूक क्षेत्रावरही होणार आहे. 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएल'च्या (एटीएफ) किमतीत बुधवारी दुप्पटीहून अधिक वाढ झाली असून, ती विक्रमी २.०७ लाख रुपये प्रति किलोलिटरवर पोहोचली आहे. यामुळे भारतीय विमान वाहतूक क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच जेट इंधनाचा दर प्रति किलोलीटर 2 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे.

दरम्यान, एटीएफच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे विमान भाड्यातही वाढ होईल, असे म्हटले जात होते. परंतु देशांतर्गत विमान कंपन्यांना याचा फटका बसणार नाही, कारण त्यांचे संरक्षण करण्यासाठी एक यंत्रणा विचाराधीन आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर मोठी वाढ होऊनही देशांतर्गत विमान कंपन्यांना एटीएफच्या दरात केवळ अंशतः वाढीचा सामना करावा लागेल, असे पेट्रोलियम मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

एका फ्लॅटमुळे संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास रोखू शकत नाही - मुंबई उच्च न्यायालय

Mumbai : पिसे पांजरपोळ जलबोगद्याला मंजुरी; पाणीगळती, पाणी चोरीच्या घटनांना लगाम

उल्हासनगरात डेंग्यूचा पहिला बळी; १७ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू