राष्ट्रीय

पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून प्रियांका गांधींचे नाव जाहीर करा; या काँग्रेस नेत्याची मागणी

काँग्रेसकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार? यासंदर्भात चर्चां सुरु असताना एका नेत्याने केली प्रियांका गांधींना उमेदवार करण्याची मागणी

नवशक्ती Web Desk

देशभरात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशामध्ये काँग्रेसकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार? याबाबत चर्चा सुरु आहेत. अशामध्ये काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना काँग्रेसकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते प्रमोद कृष्णम यांनी केली आहे. सर्वच विरोधी पक्षांनी या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असेदेखी आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसची कमान ही राहुल गांधींऐवजी प्रियांका गांधींकडे सोपवावी, अशी मागणी होत आहे. अशामध्ये काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. प्रियांका गांधींनी काँग्रेसच्या विविध कार्यक्रमांमध्ये तसेच मोर्चांमध्ये आघाडीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता काँग्रेस हायकमांड आणि विरोधी पक्ष आगामी काळामध्ये काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! हमाल, पार्किंग, एसी प्रतीक्षागृहाचे अधिकृत दर जाहीर; जादा पैसे घेतल्यास तक्रार करा

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

सख्ख्या बहिणीची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; काही वेळातच भावाने पोलिसांसमोर जाऊन दिली कबुली

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

माथेरानला जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचाच; उद्यापासून चार महिने टॉय ट्रेन बंद, आता जायचं कसं?