पंतप्रधानांविरुद्ध काँग्रेसची विशेष हक्कभंगाची नोटीस; लोकसभा अध्यक्षांना लिहिले पत्र, खासदारांच्या मतांवर टिप्पणी करणे नियमाविरुद्ध 
राष्ट्रीय

पंतप्रधानांविरुद्ध काँग्रेसची विशेष हक्कभंगाची नोटीस; लोकसभा अध्यक्षांना लिहिले पत्र, खासदारांच्या मतांवर टिप्पणी करणे नियमाविरुद्ध

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभेत विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभेत विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून सांगितले की, पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात विरोधी खासदारांच्या मतांवर आणि त्यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हे नियमांच्या विरोधात आहे.

वेणुगोपाल यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, १८ एप्रिल रोजी पंतप्रधानांनी दूरदर्शनवर देशाला संबोधित केले. पंतप्रधानांनी सुमारे २९ मिनिटांच्या भाषणात विरोधी पक्षांवर महिला आरक्षण विधेयक रोखल्याचा आरोप केला. खासदारांच्या मतदान पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या निर्णयामागील हेतूंवरही त्यांनी टिप्पणी केली. वेणुगोपाल यांनी नियम २२२ अंतर्गत ही नोटीस दिली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, हे प्रकरण लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवले जावे आणि पंतप्रधानांविरोधात कारवाई सुरू केली जावी.

काँग्रेसवर ५९ वेळा निशाणा - जयराम रमेश

काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण सामान्यतः देशाला जोडण्यासाठी आणि विश्वास वाढवण्यासाठी असते. यावेळी भाषणात उघडपणे राजकीय चर्चा झाली. काँग्रेसवर ५९ वेळा निशाणा साधण्यात आला. याला पंतप्रधानांच्या रेकॉर्डवर आणखी एक डाग मानले जाईल.

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट