नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी संविधानाच्या मूळ तत्त्वांचे उल्लंघन केले असून, ते एका 'भयंकर जोडीच्या' इशाऱ्यावर काम करणारे प्यादे बनले आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने बुधवारी केला आहे. दरम्यान, 'इंडिया' आघाडीतर्फे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अधिकृत निवासस्थानी मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध 'सार्वजनिक महाभियोग' आंदोलन पार पडणार आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस (संचार) जयराम रमेश यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले की, इतर ठिकाणी परवानगी नाकारल्यानंतर, 'इंडिया जनबंधन' ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वाजता १०, राजाजी मार्ग, नवी दिल्ली येथे मुख्य निवडणूक आयुक्तांवर सार्वजनिक महाभियोग चालवणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी संविधानाचे अक्षर आणि भावना दोन्ही पायदळी तुडवले आहेत. त्यांनी आपल्या लोकशाहीच्या पायाला पद्धतशीरपणे सुरुंग लावला आहे. ते सर्वोच्च न्यायालयासमोरही खोटे बोलले आहेत. "ते 'डायबॉलिकल ड्युओच्या (ज्यांचा नंबर पुढे येईल) इशाऱ्यावर काम करणारे एक इच्छुक मारेकरी (एक्झिक्युशनर) ठरले आहेत, असे म्हणत रमेशयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.