राष्ट्रीय

उमर खालीद, शरजील इमाम यांना जामीन नाकारला; दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

फेब्रुवारी २०२० मधील दंगल प्रकरणात "मोठ्या कटकारस्थानात" सहभागी असल्याच्या आरोपाखालील उमर खालिद, शरजील इमाम यांच्यासह नऊ जणांना जामीन नाकारताना दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी स्पष्ट केले की, आंदोलन किंवा निदर्शनांच्या नावाखाली कटकारस्थानात्मक हिंसा करण्यासाठी नागरिकांना परवानगी देता येणार नाही.

Swapnil S

नवी दिल्ली : फेब्रुवारी २०२० मधील दंगल प्रकरणात "मोठ्या कटकारस्थानात" सहभागी असल्याच्या आरोपाखालील उमर खालिद, शरजील इमाम यांच्यासह नऊ जणांना जामीन नाकारताना दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी स्पष्ट केले की, आंदोलन किंवा निदर्शनांच्या नावाखाली कटकारस्थानात्मक हिंसा करण्यासाठी नागरिकांना परवानगी देता येणार नाही.

राज्यघटना नागरिकांना आंदोलन, निदर्शने, आंदोलनांचे स्वरूपातील कार्यक्रम करण्याचा अधिकार देते. मात्र ते शांततेत, सुव्यवस्थितपणे आणि शस्त्राशिवाय असणे आवश्यक आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच करावे लागेल, असे न्यायालयाने नमूद केले.

न्या. नवीन चावला आणि न्या. शालिंदर कौर यांच्या खंडपीठाने या सर्वांविरोधात हा निकाल दिला.

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

Mumbai : धक्कादायक! SNDT कॉलेजच्या कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

Thane : 'स्वस्त घर' आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण