राष्ट्रीय

मोहालीत खासगी विद्यापीठात डर्टी पिक्चर; आरोपीला केली अटक

वृत्तसंस्था

पंजाबमधील मोहालीतील एका खासगी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील मुली अंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे.

या प्रकरणातील आरोपी विद्यार्थिनीच्या प्रियकराला पोलिसांनी शिमल्याहून अटक केली आहे. तर आरोपी विद्यार्थिनी या विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेत आहे. शनिवारी ही घटना उघड झाल्यानंतर हॉस्टेलमध्ये संताप व्यक्त करत विद्यार्थिनींनी निषेध केला. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या परिसरात रात्रभर निषेध व्यक्त केला.

याप्रकरणी वसतिगृहातीलच एका विद्यार्थिनीला आरोपी केले आहे. ही विद्यार्थिनी अन्य विद्यार्थिनींचे व्हिडीओ बनवून शिमल्यातील एका तरुणाला पाठवायची आणि तो इंटरनेटवर व्हायरल करायचा. तरुणही या विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे बोलले जात आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

या प्रकरणातील आरोपींना सोडले जाणार नाही, असे पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत बैंस यांनी म्हटले आहे. मोहाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३५४ आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुण आणि तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्याचे समजल्यानंतर आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही सांगण्यात आले; मात्र मोहालीचे एसएसपी विवेक सोनी यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्यांनी सांगितले की, “वैद्यकीय अहवालात कोणाच्याही आत्महत्येच्या प्रयत्नाची पुष्टी नाही. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर एक मुलगी धक्क्याने बेशुद्ध झाली होती, तिला रुग्णालयात नेण्यात आले, आता ती बरी आहे, असे विद्यापीठाने सांगितले.”

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक

घशाच्या इन्फेक्शनमुळे अजितदादा मोदींपासून दूर, आजपासून प्रचारात सहभागी होणार

मुंबईत आज महायुती, मविआच्या सभा; मोदी-राज एका व्यासपीठावर, बीकेसीत उद्धव, पवार, केजरीवालांची उपस्थिती