राष्ट्रीय

Doda Bus Accident: नरेंद्र मोदींकडून जखमींनसाठी आणि मृतांसाठी नुकसान भरपाई जाहीर! ट्विट करून दिली माहिती

नवशक्ती Web Desk

जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यांची संख्या ३८ आहे, तर १७ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई तसेच जखमी प्रवाशांना उपचारांसाठी मदत जाहीर केली आहे.

या मदतीविषय पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, जम्मू-काश्मीरच्या दोडा इथं झालेला बस अपघात खूपच दुःखदायक आहे. या अपघातामध्ये ज्या कुटुंबांनी आपल्या जवळच्या लोकांना आणि प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती मी सांत्वन व्यक्त करतो. तसेच जे जखमी झाले आहेत, ते लवकरात बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. या अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे तसेच जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये दिले जातील, अशी घोषणा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

ही बस किश्तवाडहून जम्मूला जात होती, यावेळी टेकडीवर चढाई आणि वळण एकत्र असल्यामुळे ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण गेलं. त्यामुळं ही बस २५० मीटर खाली दरीत कोसळली. हा अपघात दोडा जिल्ह्यातील असर भागातील त्रुंगल येथे झाला आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जातं आहे ,अशी माहिती दोडाचे एसएसपी अब्दुल कयूम यांनी दिली. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देखील ट्विट करून अपघाताची माहिती दिली, तसेच दोडाचे उपायुक्त हरविंदर सिंग यांच्याशी आपलं याबाबत बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं. जखमींना ताबडतोब किश्तवाड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस