आता भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत 
राष्ट्रीय

आता भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत

रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरून भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपला मोर्चा भारतीय तांदळाकडे वळविला आहे. ट्रम्प यांनी कृषी आयातीवर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. ज्यात भारतीय तांदूळ आणि कॅनेडियन खतांच्या समावेशाची शक्यता आहे.

Swapnil S

न्यू यॉर्क/वॉशिंग्टन : रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरून भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपला मोर्चा भारतीय तांदळाकडे वळविला आहे. ट्रम्प यांनी कृषी आयातीवर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. ज्यात भारतीय तांदूळ आणि कॅनेडियन खतांच्या समावेशाची शक्यता आहे. अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात स्वस्त दरातील परदेशी वस्तूंमुळे अमेरिकन उत्पादकांना नुकसान पोहचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

टॅरिफमुळे प्रभावित झालेल्या अमेरिकन शेतकऱ्यांसाठी १२ बिलियन डॉलर पॅकेजची घोषणा ट्रम्प यांनी केली. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित एका परिषदेत ट्रम्प यांनी भारत आणि कॅनडा यांच्यावर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. काही देश अमेरिकन बाजारपेठेत कमी दरात तांदूळ टाकत असल्याचा आरोप होत आहे. सरकार त्या आरोपांची पडताळणी करणार असल्याचेही ट्रम्प म्हणाले. बैठकीला असणाऱ्या शेतकऱ्यांनी कठोर कारवाईसाठी ट्रम्प यांच्यावर दबाव टाकला. बाजारपेठेत कमी किंमतीत परदेशी तांदूळ येत असल्याने अमेरिकन बाजारावर त्याचा परिणाम होत आहे. घरगुती वस्तूच्या किंमती त्यामुळे घसरत असल्याचा तर्क त्यांनी लावला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ट्रम्प यांनीही कठोर भूमिका घेतली. त्यांनी थेट कमी किंमतीत माल विकणारे देश विश्वासघात करत आहेत, असे सांगत या देशांवर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. कॅनेडियन आयात खतांवरही टॅरिफ लावला जाऊ शकतो, असे ट्रम्प म्हणाले. लुइसियाना येथे कॅनेडी राइस मिलच्या सीईओ मेरिल कॅनेडी यांनी बैठकीत डंपिंग करणाऱ्या देशांमध्ये भारत, थायलंड आणि चीन असल्याचे सांगितले. चीन तांदूळ थेट अमेरिकेत नाही तर प्यूर्टो रिकोला पाठवत आहे. ज्यामुळे दक्षिण अमेरिकेत तांदूळ उत्पादकांवर संकट ओढवले आहे. टॅरिफमुळे काही प्रमाणात चाप बसला आहे. परंतु आपल्याला ते दुप्पट करण्याची गरज आहे, अशी मागणी बैठकीत मेरिल कॅनेडी यांनी ट्रम्प यांच्याकडे केली.

दरम्यान, भारताला अमेरिकेत तांदूळ विक्री करण्याची परवानगी आहे का, असे ट्रम्प यांनी सहकारी मंत्र्याला विचारले. त्यावर नाही, आपण अजून त्यांच्याशी व्यापारावर चर्चा करत आहोत, असे उत्तर मिळाले. विशेष म्हणजे हा प्रकार अशावेळी उघडकीस आला आहे जेव्हा भारत आणि अमेरिका दोघेही त्यांच्या आर्थिक संबंधांना स्थिर करण्यासाठी व्यापारी करारावर भर देत आहेत. ट्रम्प यांनी याआधी भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लावले होते.

Mumbai : गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करणे म्हणजे निष्काळजीपणा नाही; मृताच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

मुंबईकरांनो लक्ष द्या! शुक्रवारी अंधेरी, BKC, धारावीसारख्या महत्त्वाच्या भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद; जपून पाणी वापरा - BMC

आंबा, काजू, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यातील महानगरपालिकांच्या मतदार यादी कार्यक्रमात महत्त्वाचे बदल; आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत होणार लागू?

लाडक्या बहिणींची ओवाळणी लाटणाऱ्या भावांना दणका; राज्य सरकार पैसे परत घेणार; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा