केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय; ‘एसआयआर’ला पुन्हा मुदतवाढ 
राष्ट्रीय

केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय; ‘एसआयआर’ला पुन्हा मुदतवाढ

देशातील सहा राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार मसुदा मतदार याद्या डिसेंबर अखेरीस प्रकाशित होतील.

Swapnil S

नवी दिल्ली : देशातील सहा राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाला (एसआयआर) मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात, तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अंदमान-निकोबार बेट आणि उत्तर प्रदेशासाठी ‘एसआयआर’चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या सहा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील प्रक्रिया गुरुवारी संपणार होती आणि मसुदा मतदार याद्या १६ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार होत्या. मात्र, त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

तमिळनाडू आणि गुजरात : गणना प्रक्रिया १४ डिसेंबरपर्यंत वाढवली असून मसुदा मतदार याद्या १९ डिसेंबरला प्रकाशित होतील.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अंदमान-निकोबार बेटे : गणना प्रक्रिया १८ डिसेंबरपर्यंत वाढवली असून मसुदा याद्या २३ डिसेंबरला प्रकाशित होतील.

उत्तर प्रदेश : गणना प्रक्रिया २६ डिसेंबरपर्यंत वाढवली असून मसुदा याद्या ३१ डिसेंबरला प्रकाशित होतील.

गोवा, पुद्दुचेरी, लक्षद्वीप, राजस्थान आणि पश्चिम बंगाल यांच्यातील गणना प्रक्रिया गुरुवारीच संपेल आणि मसुदा मतदार याद्या १६ डिसेंबरला प्रकाशित होतील.

केरळमधील गणना प्रक्रिया १८ डिसेंबरला संपून मसुदा मतदार यादी २३ डिसेंबरला जाहीर होईल.

पात्र मतदार वंचित राहू नये म्हणून नवीन मतदारांना ‘फॉर्म ६’ भरून ब्लॉक लेव्हल ऑफिसरकडे (बीएलओ) सादर करण्याचे अथवा ईसीआयनेट अॅप किंवा वेबसाईटवर ऑनलाइन सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अंतिम मतदार याद्या फेब्रुवारीत प्रकाशित केल्या जाणार आहेत.

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय

बापरे! मध्यान्ह भोजनात मिठाऐवजी चक्क डिटर्जंट? जेवणानंतर २४ हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल, VIDEO

संतापजनक! पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर ५० वर्षीय काकाकडून अत्याचार; FIR नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस