प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

२० लाखांची लाच घेताना ‘ईडी’च्या अधिकाऱ्याला 'सीबीआय'ने केली अटक

‘ईडी’चा सहाय्यक संचालक संदीप सिंह यादव याला २० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून सीबीआयने अटक केली.

Swapnil S

नवी दिल्ली : ‘ईडी’चा सहाय्यक संचालक संदीप सिंह यादव याला २० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून सीबीआयने अटक केली. ईडीने नुकतीच सोन्याच्या व्यापाऱ्यांवर छापेमारी केली होती.

२५ लाख रुपये न दिल्यास मुलाला अटक करण्याची धमकी त्याने सोन्याच्या व्यापाऱ्याला दिली. वाटाघाटीनंतर २० लाख रुपये लाच देण्याचे ठरले. त्यानंतर सीबीआयने ‘ईडी’चा अधिकारी यादव याला रंगेहात पकडले. यादव याची सीबीआयकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी