तमिळनाडूत द्रमुक, केरळमध्ये काँग्रेसला अधिक पसंती; ‘एक्झिट पोल्स’मध्ये दीदींना धक्का (संग्रहित फोटो)
राष्ट्रीय

तमिळनाडूत द्रमुक, केरळमध्ये काँग्रेसला अधिक पसंती; ‘एक्झिट पोल्स’मध्ये दीदींना धक्का

पाच राज्य विधानसभांचे मतदान आटोपल्यानंतर बुधवारी प्रसृत झालेल्या विविध एक्झिट पोल्सनुसार, आसाममध्ये भाजपचा मोठा विजय आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसपेक्षा भाजपला अधिक पसंती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: पाच राज्य विधानसभांचे मतदान आटोपल्यानंतर बुधवारी प्रसृत झालेल्या विविध एक्झिट पोल्सनुसार, आसाममध्ये भाजपचा मोठा विजय आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसपेक्षा भाजपला अधिक पसंती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, तामिळनाडूमध्ये द्रवीड मुन्नेत्र कळघम सरकारचे पुनरागमन आणि केरळमध्ये १० वर्षांनंतर काँग्रेस प्रणित यूडीएफ पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

तथापि, काही संस्थांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या मोठ्या विजयाचा आणि तामिळनाडूमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला आहे, जिथे अभिनेता विजय यांचा नवा पक्ष टीव्हीके 'गेमचेंजर' ठरू शकतो. पुद्दुचेरीमध्ये मात्र जवळपास सर्वच संस्थांनी पुन्हा एनडीएचे सरकार येईल असे म्हट

पश्चिम बंगालमध्ये एकूण जागा २९४ असून बहुमतासाठी १४८ची गरज आहे. बहुतेक एक्झिट पोल्सनी भाजपला आघाडी दिली असली, तरी काही अपवाद आहेत:

'पीपल्स पल्स'ने तृणमूलला १७७-१८७ जागा, तर 'जनमत पोल'ने १९५-२०५ जागांचा अंदाज दिला आहे.'मॅट्रिझ'ने भाजपला १४६-१६१ जागा, पी मार्गने १५०-१७५ आणि 'प्रजा पोल'ने १७८-२०८ जागांचा मोठा अंदाज वर्तवला आहे.

तामिळनाडूमध्ये एकूण जागा २३४ असून बहुमतासाठी ११८ ची गरज आहे. येथे चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. 'पीपल्स पल्स' (१२५-१४५ जागा) आणि 'प्रजा पोल' (१४८-१६८ जागा) यांनी द्रमुकच्या विजयाचा अंदाज दिला आहे.

'ॲक्सिस माय इंडिया'ने द्रमुकला ९२-११० आणि अभिनेता विजय यांच्या टीव्हीके ला ९८-१२० जागा मिळतील असा धक्कादायक अंदाज वर्तवत त्रिशंकू स्थिती दर्शवली आहे.जेव्हीसी ही एकमेव संस्था आहे जिने अण्णा द्रमुकला १२८-१४७ जागांसह विजयाचा कौल दिला आहे.आसाममध्ये एकूण जागा १२६ असून भाजप पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे: दोन संस्थांनी तर भाजपला ८५ ते १०० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

केरळमध्ये सत्तापालटाचे वारे वाहत असल्याचे चित्र आहे.'ॲक्सिस माय इंडिया'ने काँग्रेस आघाडीला ७८-९० जागा आणि सत्ताधारी डाव्या आघाडीला ४९-६२ जागा दिल्या आहेत.

AIचा वापर आणि रोजगार... दोन्हीही वाढणार; राज्याचे कृत्रिम बुद्धिमता धोरण जाहीर, ५ वर्षात १० हजार कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख रोजगाराचे ध्येय

ठाकरे गटाची दानवेंना उमेदवारी, काँग्रेस संतप्त; विधानपरिषद निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे 

सरपंच निवडणुकांमध्ये चाकणकर, तटकरेंना धक्का; मस्साजोगमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव

Mumbai : ‘पॉड टॅक्सी’साठी ४९९ झाडे तुटणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने लंडनमध्ये अध्यासन