NEET UG 2026 : ओएमआर शीट बनावट? NTA चा इशारा 
राष्ट्रीय

NEET UG 2026 : ओएमआर शीट बनावट? NTA चा इशारा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट फेरपरीक्षेला बसलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांना इशारा दिला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट फेरपरीक्षेला बसलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांना इशारा दिला आहे. निकालातील तफावतीबाबत तक्रार करताना बनावट किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या ओएमआर शीट सादर करू नका, असे निर्देश एजन्सीने दिले आहेत.

नीटच्या फेरपरीक्षेच्या निकालांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी एजन्सीला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची पडताळणी करत असतान अनेक तक्रारदारांनी जोडलेली ओएमआर शीट्स ही बनावट आहेत किंवा ती एआयच्या मदतीने तयार करण्यात आली आहेत, असे आढळून आल्याचे एजन्सीने म्हटले आहे. अशा बनावट शीट सादर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते असा असे एजन्सीने आपल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला असून, ११.२१ लाख उमेदवार पात्र ठरले आहेत. मात्र अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातून ओएमआर शीटवर ६०० च्या वर गुण असताना प्रत्यक्षात खूपच कमी गुण मिळाल्याची काही उदाहरणे समोर आली आहेत. देशात इतरत्रही अशाच गफलती झाल्या आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल