दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना रोखले; भारत-अमेरिका कराराविरोधात किसान पंचायत आक्रमक  (Photo-X)
राष्ट्रीय

दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना रोखले; भारत-अमेरिका कराराविरोधात किसान पंचायत आक्रमक

भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या प्रस्तावित व्यापार कराराविरोधात दिल्लीत आयोजित 'किसान महापंचायती'त सहभागी होण्यासाठी निघालेल्या पंजाबमधील शेकडो शेतकऱ्यांना मंगळवारी हरयाणा पोलिसांनी शंभू सीमेवर रोखले.

Swapnil S

शंभू/अंबाला : भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या प्रस्तावित व्यापार कराराविरोधात दिल्लीत आयोजित 'किसान महापंचायती'त सहभागी होण्यासाठी निघालेल्या पंजाबमधील शेकडो शेतकऱ्यांना मंगळवारी हरयाणा पोलिसांनी शंभू सीमेवर रोखले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने अंबाला जिल्ह्यात जमावबंदीचे (कलम १४४) आदेश लागू केले आहेत.

'देश बचाओ मोर्चा'च्या बॅनरखाली दिल्लीतील 'किसान घाट' येथे एका दिवसाच्या किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या संघटनांचे झेंडे घेऊन पंजाबमधील शेकडो शेतकरी मंगळवारी सकाळी बसमधून दिल्लीकडे जाण्यासाठी शंभू सीमेवर एकत्र आले होते, मात्र त्यांना हरयाणात प्रवेश नाकारण्यात आला.

हरयाणाच्या शेतकऱ्यांना सिंगू सीमेवर रोखून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांना दिल्लीच्या दिशेने पुढे जाण्यास बंदी घातली असून, गाड्या सीमेवरच उभ्या करून तेथेच थांबण्याचे निर्देश दिले.

पंजाब आणि हरयाणाच्या सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घग्गर नदीच्या पुलावर साखळदंडांनी बांधलेली बॅरिकेट्स आणि सिमेंटचे ब्लॉक लावून रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला असून, वॉटर कॅनन गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

पंजाब-हरयाणाच्या खानावरी बॉर्डर, शाहबाद (कुरुक्षेत्र) आणि कर्नाल येथेही अनेक शेतकऱ्यांना रोखण्यात आल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. शेतकरी नेते सरवणसिंग पंढेर यांनी हरयाणातील नायब सिंग सैनी सरकारवर कडक शब्दांत टीका केली.

आम्हाला दिल्लीत शांततेच्या मार्गाने जायचे होते, पण हरयाणा सीमेवर आम्हाला जबरदस्तीने रोखण्यात आले. आम्ही फक्त ४ तासांच्या कार्यक्रमासाठी चाललो होतो, मग प्रशासनाला आमच्याकडून कसला धोका आहे, हा प्रकार हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचा खरा चेहरा समोर आणणारा आहे, असे पंढेर म्हणाले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती