राष्ट्रीय

सणांच्या काळात रेल्वे तिकिटात २० टक्के सवलत; जाण्याचे आणि परतीचे तिकीट काढल्यास फायदा

देशात जेव्हा जेव्हा सण येतात. तेव्हा प्रत्येक रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होते. हजारो प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी सुरक्षित प्रवासासाठी रेल मंत्री अश्विनी वैष्णव मोठी भेट दिली आहे. तुम्ही जातानाचे व परतीचे तिकीट एकाचवेळी बुक केल्यास तुम्हाला २० टक्के सवलत दिली जाणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : देशात जेव्हा जेव्हा सण येतात. तेव्हा प्रत्येक रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होते. हजारो प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी सुरक्षित प्रवासासाठी रेल मंत्री अश्विनी वैष्णव मोठी भेट दिली आहे. तुम्ही जातानाचे व परतीचे तिकीट एकाचवेळी बुक केल्यास तुम्हाला २० टक्के सवलत दिली जाणार आहे.

रेल्वे खात्याने 'राऊंड ट्रिप पॅकेज' या नावाखाली ही सुविधा सुरू केली आहे. या योजनेतंर्गत कोणताही प्रवासी जातानाचे व परतीचे तिकीट एकाचवेळी बुक करत असल्यास त्याला २० टक्के सवलत दिली जाईल. १३-२६ ऑक्टोबर जातानाचे व परतीचे तिकीट १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान काढणाऱ्या प्रवाशांना या सवलतीचा लाभ देण्याचे ठरवले आहे. तसेच दोन्ही तिकीट एकाच वर्गाचे व एकच जोडी स्टेशनचे असायला हवे.

या सवलतीच्या तिकिटांचे आरक्षण १४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही सवलत राजधानी, शताब्दी, दुरंतो या ट्रेनला मिळणार नाही. १४ ऑगस्ट रोजी रेल्वेच्या १३ ऑक्टोबर २०२५ च्या तिकीट आरक्षणाला प्रारंभ होणार आहे. या योजनेमुळे सणांच्या काळात होणारी गर्दी विभागली जाईल. प्रवाशांची गर्दी वेगवेगळ्या तारखांमध्ये वर्गीकृत होईल. खास गाड्यांचा योग्य प्रकारे उपयोग होईल. तसेच प्रवाशांना सहजपणे तिकीट मिळू शकेल.

तिकीट रद्द झाल्यास पैसे परत मिळणार नाहीत

या योजनेत पहिल्यांदा जातानाचे तिकीट बुक होईल. त्यानंतर कनेक्टिंग जर्नी फीचरमधून परतीचे तिकीट काढले जाऊ शकते. या तिकीट बुकिंग करताना आगाऊ आरक्षणाचे नियम लागू होणार नाहीत. या तिकीटात कोणतेही बदल करता येणार नाहीत. यात महत्त्वाची बाब म्हणजे, या योजनेत काढलेले तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना परतावा मिळणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले.

मूळ भाड्यावर सवलत मिळणार

जातानाचे-परतीचे तिकीट एकाच प्रवाशाचे नाव व कन्फर्म असल्यास या योजनेचा फायदा घेता येऊ शकेल. परतीच्या तिकिटाचे बुकिंग करायला आगाऊ आरक्षण कालावधी लागू असणार नाही. तिकिटाची सवलत केवळ परतीच्या मूळ भाड्यावर दिली जाईल. रेल्वेने सांगितले की, ही योजना केवळ प्रायोगिक तत्त्वावर लागू केली आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांचा चांगला वापर होईल, अशी आशा आहे.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...