राष्ट्रीय

का केली दिव्या पाहूजाची हत्या? आरोपीने केला खुलासा

Swapnil S

हरियाणातील गुरुग्राममधील एका हॅाटेलमध्ये झालेल्या मॉडेल दिव्या पाहुजा हिच्या हत्या प्रकरणात सतत नवनवीन खुलासे होत आहेत. सुरूवातीला सीसीटीव्ही फुटेजद्वारे दिव्याची हत्या करणाऱ्या आरोपीने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली हे उघड झाले. त्यानंतर या हत्येचा संबंध 2016 मध्ये झालेल्या कुख्यात गँगस्टर संदीप गडोली याच्या एन्काऊंटरशी जोडला गेला आणि आता अटक झालेल्या आरोपींनी पोलिसांना जबाब दिला आहे. यानंतर ब्लॅकमेलिंगचा वेगळा अँगलही समोर आला आहे. एकंदरीत या हत्येची कहाणी एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही.

माहितीनुसार, अद्याप दिव्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही. गुरुग्राम पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी हॉटेल मालक अभिजीत सिंग याच्यासह ३ जणांना अटक केली आहे. आरोपी अभिजीत, हेमराज आणि ओमप्रकाश यांची सतत चौकशी सुरू आहे. चौकशीच्या आधारे पोलिसांचे पथक पंजाबमध्ये पोहोचले आहे. मृतदेह पंजाबमधील घग्गर नदीत फेकून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. ज्या बीएमडब्ल्यू कारमधून मृतदेह बेपत्ता झाला होता तिचाही पोलीस शोध घेत आहेत. आरोपींनी बीएमडब्ल्यू कारमध्ये मृतदेह ज्या मार्गावर नेला त्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

दिव्या पाहुजावर ब्लॅकमेलिंगचा आरोप -

चौकशीदरम्यान, दिव्या काही अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होती आणि त्याबदल्यात पैसे मागत होती. त्यामुळे दोन साथीदारांच्या मदतीने तिला गोळी घातली, असे आरोपी अभिजीतने पोलिसांना सांगितले आहे. दुसरीकडे, दिव्याच्या कुटुंबियांनी हा दावा फेटाळला आहे. या प्रकरणात दिव्याचा मोबाईल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सध्या पोलीस या मोबाईलचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास गुरुग्राम पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

Video : बिनशर्त पाठिंब्यानंतर नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर, समोर आला पहिला टिझर

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी वर्तवला अंदाज

पाच वर्षाच्या मुलामुळे बंद होणार दारूची दुकाने, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

EVM की खेळणं! BJP नेत्याच्या लहान मुलानं केलं मतदान; नेत्यावर गुन्हा दाखल, अधिकारी निलंबित

Nagpur Shocker : शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षाचालकाने केला १० वीच्या मुलीचा विनयभंग; Video व्हायरल झाल्यावर घटना उघडकीस