FSSAI चा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी स्टेपल पिन, धातूच्या तारांवर बंदी; अन्यथा होणार कारवाई 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

FSSAI चा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी स्टेपल पिन, धातूच्या तारांवर बंदी; अन्यथा होणार कारवाई

हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, मिठाई दुकाने तसेच ऑनलाइन फूड डिलिव्हरीशी संबंधित अनेक आस्थापनांकडून पॅकिंगसाठी स्टेपल पिन आणि धातूच्या तारांचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले होते.

किशोरी घायवट-उबाळे

खाद्यपदार्थांमध्ये धातूचे तुकडे किंवा स्टेपल पिन आढळल्याच्या घटना समोर आल्यानंतर भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) कठोर पाऊल उचलले आहे. ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून खाद्यपदार्थांचे पॅकिंग आणि सीलिंग करताना स्टेपल पिन, धातूच्या तारा किंवा तत्सम धातूच्या साहित्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला आहे.

FSSAI ने जारी केलेल्या निर्देशानुसार, हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, मिठाई दुकाने तसेच ऑनलाइन फूड डिलिव्हरीशी संबंधित अनेक आस्थापनांकडून पॅकिंगसाठी स्टेपल पिन आणि धातूच्या तारांचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले होते.

अन्नसुरक्षेला धोका

नियामक संस्थेने सांगितले की, केक, मिठाई, स्नॅक्स आणि इतर खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूच्या पिन किंवा तारा चुकून अन्नामध्ये जाण्याचा धोका असतो. अशा वस्तू अन्नासोबत शरीरात गेल्यास गंभीर दुखापत होऊ शकते किंवा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

याच पार्श्वभूमीवर सर्व अन्न व्यवसाय चालकांना खाद्यपदार्थांचे पॅकेट, फूड पार्सल किंवा टेकअवे ऑर्डर सील करण्यासाठी धातूच्या साहित्याचा वापर तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नियम मोडल्यास कारवाई

FSSAI ने स्पष्ट केले आहे की, या निर्देशांचे पालन न करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट किंवा इतर अन्न व्यवसायांवर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट, २००६ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य

अन्नपदार्थांचे पॅकिंग अधिक सुरक्षित करणे आणि ग्राहकांना अनावश्यक धोक्यांपासून वाचवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे FSSAI ने म्हटले आहे. अन्नसुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

तरुणाईवर राज्य करणारा नेता

नरेंद्र मोदी आणि त्यांनी मुक्त केलेली पिढी

आजचे राशिभविष्य, १७ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा बदामाचा शिरा; तुपाचा सुगंध आणि केशराची चव, अशी आहे सोपी रेसिपी