सोन्या-चांदीवरील आयात शुल्क दुप्पट; रुपया सावरण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय 
राष्ट्रीय

सोन्या-चांदीवरील आयात शुल्क दुप्पट; रुपया सावरण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

देशातील परकीय चलन साठ्यावरील ताण कमी करण्यासाठी आणि घसरणाऱ्या रुपयाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात दुपटीहून अधिक वाढ केली आहे. सोन्या-चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के करण्यात आले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : देशातील परकीय चलन साठ्यावरील ताण कमी करण्यासाठी आणि घसरणाऱ्या रुपयाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात दुपटीहून अधिक वाढ केली आहे. सोन्या-चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के करण्यात आले आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ९५.७१ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर बंद झाला. मंगळवारी तो ९५.७५ पर्यंत घसरला होता. पश्चिम आशियातील संकटामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०७ डॉलरवर पोहोचले आहेत. खते आणि तेलाच्या आयातीसाठी परकीय चलन वाचवणे सरकारसाठी अत्यावश्यक झाले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सोन्या-चांदीची आयात २६.७ टक्क्यांनी वाढून १०२.५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

बदल आणि नवे दर

सरकारने सोन्या-चांदीसोबतच प्लॅटिनमच्या दरातही वाढ केली आहे. सोने आणि चांदी : ६ टक्क्यांवरून १५ टक्के (यात १०टक्के मूळ सीमा शुल्क आणि ५टक्के कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर समाविष्ट आहे). तर प्लॅटिनमः ६.४टक्क्यांवरून १५.४ टक्के अशी वाढ करण्यात आली आहे. ३टक्के जीएसटी गृहीत धरल्यास, सोन्यावरील एकूण प्रभावी कर आता १८.४५ टक्के होईल, यापूर्वी तो ९.१८ टक्के होता.

सोन्या-चांदीच्या बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता; अमेरिकेची आकडेवारी, पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम राहणार

Mumbai : २,७५४ मेट्रिक टन साहित्य जमा; विसर्जनानंतर ५१० मेट्रिक टन साहित्याची वाहतूक, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून प्रभावी सेवा

ओपन एआयने थांबवला टूलचा वापर; AI एजंटची कंपनी इंटरनेट निर्बंधांवर मात

Mumbai : गणेशोत्सवात लालबाग-परळमध्ये चप्पल बुटांचा खच; आठ मेट्रिक टन चप्पल-बूट जमा, पुनर्प्रक्रियेनंतर गरजूंना होणार वाटप

Mumbai : ‘त्या’ रहिवाशांच्या संक्रमण भाड्यात कपात