सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त 
राष्ट्रीय

सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त

मौल्यवान धातूंच्या दरातील घसरण शुक्रवारीही कायम राहिली. राजधानी दिल्लीतील सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ५,२०० रुपयांची मोठी घसरण होऊन तो १ लाख २९ हजार ३०० रुपयांवर आला. तर चांदीच्या किलोच्या दरात ४ हजार रुपयांची घट झाली.

Swapnil S

नवी दिल्ली : मौल्यवान धातूंच्या दरातील घसरण शुक्रवारीही कायम राहिली. राजधानी दिल्लीतील सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ५,२०० रुपयांची मोठी घसरण होऊन तो १ लाख २९ हजार ३०० रुपयांवर आला. तर चांदीच्या किलोच्या दरात ४ हजार रुपयांची घट झाली. जागतिक बाजारपेठेत सातत्याने सुरू असलेल्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला आहे.

९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात सलग नवव्या सत्रात घसरण झाली. गुरुवारी प्रति १० ग्रॅम १ लाख ३४ हजार ५०० रुपये असलेला सोन्याचा दर शुक्रवारी ५,२०० रुपयांनी घसरून १ लाख २९ हजार ३०० रुपयांवर आला. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, या दरात सर्व करांचा समावेश आहे.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. चांदीचा दर किलोमागे ४,००० रुपयांनी कमी होऊन १ लाख ५८ हजार रुपयांवर आला. मागील सत्रात चांदीचा दर १ लाख ६२ हजार रुपये प्रति किलो होता. देशांतर्गत बाजारातील घसरणीचा परिणाम जागतिक बाजारपेठेतही दिसून आला. आंतरराष्ट्रीय व्यवहारात स्पॉट सोन्याचा दर ३८.९९ डॉलर म्हणजेच १.०८ टक्क्यांनी घसरून प्रति औंस ३,५८६.३२ डॉलर झाला. चांदीचा दरही जवळपास एक टक्क्याने घसरून प्रति औंस ४२.६२ डॉलरवर आला. गुंतवणूकदारांकडून व्यवहारातील गुंतवणूक काढून घेतल्याने दोन्ही धातूंच्या दरातील घसरण कायम राहिली.

सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर सप्टेंबर २०२५ नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. विश्लेषकांच्या मते, मौल्यवान धातूंमधील विक्रीचा दबाव अद्याप कमी झालेला नसल्याने गुंतवणूकदारांसाठी हा आणखी एक धक्का ठरला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

विठु दर्शनाची लागे मज आस! कार्तिकी यात्रेसाठी गजबजली अवघी पंढरी; ४ लाख भाविकांची मांदियाळी, गोपाळपूरच्या पुढे दर्शन रांग

गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा; ५० पेक्षा कमी सभासद संख्येच्या संस्थांची निवडणूक SGM मध्ये; महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांत सुधारणा

आंबेडकर स्मारक रखडले; खर्च वाढल्याने ३५० कोटींचा प्रस्ताव प्रलंबित; प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा विलंब होण्याची शक्यता

नागपूरचे नाव 'दीक्षाभूमी' करा - उद्धव ठाकरे

रेसकोर्सवर उद्यानच साकारणार; BMC कडून १२० एकर जागेवरील भूमिगत सुविधांना ब्रेक; इनडोअर खेळ, पार्किंग आणि कॉन्फरन्स हॉलचा प्रस्ताव रद्द