भटक्या कुत्र्याला वाचवताना कारचा अपघात; पत्नीचा मृत्यू, शिक्षकाने स्वत:विरोधात दाखल केला FIR
भटक्या कुत्र्याला वाचवताना कारचा अपघात; पत्नीचा मृत्यू, शिक्षकाने स्वत:विरोधात दाखल केला FIR  प्रातिनिधिक छायाचित्र | Pixabay
राष्ट्रीय

भटक्या कुत्र्याला वाचवताना कारचा अपघात; पत्नीचा मृत्यू, शिक्षकाने स्वत:विरोधात दाखल केला FIR

Swapnil S

अहमदाबाद: देशात भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. अलीकडच्या काळात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे अनेक जण जखमी झालेत, तर काही जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तसे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले. आता गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एका ५५ वर्षीय शिक्षकाने महामार्गावर भटक्या कुत्र्यामुळे झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर स्वत:विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, परेश दोशी असे या शिक्षकाचे नाव असून ते गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी मंदिरात पूजा करून परतत होते. त्यांची कार साबरकांठा येथे महामार्गावर पोहोचताच अपघात झाला. त्यांच्या गाडीसमोर अचानक एक भटका कुत्रा आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात परेशने गाडीवरील नियंत्रण गमावल्यामुळे भीषण अपघात झाला.

ऑटो लॉक सिस्टीम सक्रिय झाल्यामुळे...

खेरोज-खेडब्रह्मा महामार्गावरील दान माहुडी गावाजवळ रविवारी (४ फेब्रुवारी) दुपारी हा अपघात झाला. महामार्गाच्या कडेला लावलेल्या तात्पुरत्या खांबांवर आणि बॅरिकेड्सला परेश यांची कार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, बॅरिकेड्स कारच्या पॅसेंजर खिडकीतून आत घुसले आणि समोर पॅसेंजर सीटवर बसलेल्या अमिता गंभीर जखमी झाल्या. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र जोरदार धडकेमुळे कारची ऑटो लॉक सिस्टीम सक्रिय झाल्याने अमिताला वेळीच बाहेर काढणे त्यांना शक्य झाले नाही आणि दाम्पत्य कारमध्येच अडकले. जमलेल्या लोकांनी खिडक्या फोडून त्यांना कसेबसे बाहेर काढले. अमिता यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृत घोषित केले.

परेश दोशी यांनी स्वत:विरोधात एफआयआर दाखल केला

पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर परेश दोशी यांनी पोलिस ठाणे गाठले आणि स्वत:विरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, ते अंबाजी मंदिरातून परतत असताना अपघात झाला आणि अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. अपघातास तोच जबाबदार असून केवळ त्याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याने बेदरकारपणे वाहन चालविणे आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

"राज ठाकरे महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर...", संजय राऊतांची टीका

एसटी कामगारांच्या वेतनाचा मार्ग मोकळा; शासन निर्णय जारी : ८७ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा

रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांची होणार गैरसोय

आणखी एक आमदार शरद पवार गटात? अजित पवार यांना धक्का; झिरवळ यांची मविआच्या बैठकीत हजेरी

माझ्याकडे दोनच पर्याय, तुरुंग किंवा पक्ष बदलणे! शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ