लोकसभेत हरदीपसिंग पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी; सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब Photo : X
राष्ट्रीय

लोकसभेत हरदीपसिंग पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी; सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब

लोकसभेत शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवशी विरोधकांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे प्रश्नोत्तराचा तास गोंधळामुळे विस्कळीत झाला. सभागृहाचे कामकाज आता ९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्तेसाठी देशाचे विभाजन करावयाचे होते, असा आरोप भाजपने यावेळी केला.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभेत शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवशी विरोधकांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे प्रश्नोत्तराचा तास गोंधळामुळे विस्कळीत झाला. सभागृहाचे कामकाज आता ९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्तेसाठी देशाचे विभाजन करावयाचे होते, असा आरोप भाजपने यावेळी केला.

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे खासदार घोषणाबाजी करत होते. यानंतर सभापती संध्या राय यांनी लोकसभा दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केली. दुपारी १२ वाजता कामकाज सुरू झाले. या काळात शिक्षण आणि कायदा मंत्रालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांसह अनेक मंत्र्यांनी विधेयके सादर केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात होत आहे. २३ दिवसांच्या विश्रांतीनंतर, अधिवेशनाचा दुसरा भाग ९ मार्च रोजी सुरू होईल आणि तो २ एप्रिलपर्यंत चालेल. दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शुक्रवारी राहुल गांधींवर आरोप केले की, ते सत्ता मिळवण्यासाठी देशाच्या फाळणीचे नियोजन करत होते.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता