मातृत्वाला काळिमा! रडणाऱ्या तान्ह्या बाळाच्या तोंडात कोंबला कापडाचा बोळा अन् जिवंत जाळलं 
राष्ट्रीय

मातृत्वाला काळिमा! रडणाऱ्या तान्ह्या बाळाच्या तोंडात कोंबला कापडाचा बोळा अन् जिवंत जाळलं

आई म्हणावं की वैरीण? ज्या आईच्या कुशीत सर्वांत सुरक्षित वाटतं, त्याच आईने आपल्या दोन महिन्यांच्या तान्ह्या बाळाला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे.

Mayuri Gawade

आई म्हणावं की वैरीण? ज्या आईच्या कुशीत सर्वांत सुरक्षित वाटतं, त्याच आईने आपल्या दोन महिन्यांच्या तान्ह्या बाळाला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तेलंगणाच्या हैदराबादमधील बोवरामपेट येथे मंगळवारी (दि.२४) सकाळी ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

बांधकाम साईटवरील मजुरांचे कुटुंब

मिळालेल्या माहितीनुसार, ममता आहिरवार (२०) आणि तिचा पती राजेंद्र आदिवासी (२१) हे मूळचे मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत. रोजगाराच्या शोधात ते काही काळापूर्वी हैदराबादमध्ये आले होते. बोवरामपेट येथील सनारेली अपार्टमेंट्सच्या बांधकाम साईटवर दोघेही मजुरीचे काम करत होते. साईटजवळील खोलीत ते आपल्या दोन महिन्यांचा मुलगा सूर्य याच्यासह राहत होते.

वडिलांसमोर उघड झाला धक्कादायक प्रकार

मंगळवारी दुपारच्या सुमारास राजेंद्र कामावरून परतला असता घरातील दृश्य पाहून तो हादरला. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने पत्नीला बाळाला चुलीतील आगीत जाळताना पाहिले. त्यावेळी त्याने तात्काळ हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता.

बाळाच्या रडण्यामुळे टोकाचं पाऊल?

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, बाळ सतत रडत असल्याने ममता मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. "तिने आधी बाळाच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून त्याचे रडणे थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याचे हात-पाय बांधून जळत्या चुलीत टाकले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला," अशी माहिती स्थानिक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त चंद्रशेखर शंकर रेड्डी यांनी दिली.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले त्यानंतर बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आईला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेमागील नेमकी कारणे, तसेच ती मानसिक तणावाखाली होती का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai : ठाकरे बंधूंची आज दादरमध्ये विजयी सभा; तरुणांनी भीती घालवली - उद्धव ठाकरे

Mumbai : मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून १३६.१० कोटींचे उत्पन्न

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईत तस्करीपेक्षा अमली पदार्थ सेवनाचे गुन्हे अधिक; ड्रग्जविरोधात पोलिसांचे युद्ध

Mumbai : जन्म दाखल्यासाठी सॉफ्टवेअर आणणार; मानखुर्द, कुर्ल्यातील दाखल्यांचा तत्काळ निपटारा करा, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश