AI आणि डेटा अ‍ॅनालिटिक्सचा समावेश सीएच्या अभ्यासक्रमात होणार; बदलत्या तांत्रिक, व्यावसायिक बदलांशी सुसंगत राहण्यासाठी 'आयसीएआय'चा प्रयत्न 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

AI आणि डेटा अ‍ॅनालिटिक्सचा समावेश सीएच्या अभ्यासक्रमात होणार; बदलत्या तांत्रिक, व्यावसायिक बदलांशी सुसंगत राहण्यासाठी 'आयसीएआय'चा प्रयत्न

चार्टर्ड अकाउंटंट्सची सर्वोच्च संस्था 'आयसीएआय' बदलत्या तांत्रिक आणि व्यावसायिक बदलांशी सुसंगत राहण्यासाठी अभ्यासक्रमात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय - कृत्रिम बुद्धिमत्ता), डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि इतर विषयांचा समावेश करणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : चार्टर्ड अकाउंटंट्सची सर्वोच्च संस्था 'आयसीएआय' बदलत्या तांत्रिक आणि व्यावसायिक बदलांशी सुसंगत राहण्यासाठी अभ्यासक्रमात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय - कृत्रिम बुद्धिमत्ता), डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि इतर विषयांचा समावेश करणार आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामध्ये सध्या लाखो विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंटचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत, तर या संस्थेचे ५ लाखांहून अधिक सदस्य आहेत.

आयसीएआयचे अध्यक्ष प्रसन्न कुमार डी. यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तंत्रज्ञान आता अग्रस्थानी येत असल्यामुळे अभ्यासक्रमातील विषयांमध्ये एआय आणि डेटा अ‍ॅनालिटिक्सचा प्रामुख्याने समावेश करणे आवश्यक आहे.

संस्थेने नुकतीच शिक्षण आणि प्रशिक्षण पुनरावलोकन समिती स्थापन केली आहे, जी आगामी महिन्यांत अभ्यासक्रमातील अद्ययावत बदलांसह आपल्या शिफारशींना अंतिम रूप देईल अशी अपेक्षा आहे. बिगर-आर्थिक रिपोर्टिंग, ईएसजी डिस्क्लोजर्स, एआय, डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि फॉरेन्सिक ऑडिटिंगवर वाढत्या लक्षामुळे अकाउंटन्सी व्यवसायात बदल झाला आहे.

आम्ही 'क्रेट' समिती स्थापन केली आहे. अभ्यासक्रम, कोणते विषय बदलणे आवश्यक आहे आणि प्रशिक्षण (आर्टिकलशिप) या संपूर्ण रचनेचे पुनरावलोकन करण्याचे काम ही समिती करत आहे. एका इंजिनिअरसाठी एआय हा एक स्वतंत्र विषय असू शकतो, परंतु आमच्यासाठी एआय हा केवळ एक विषय नाही, तर एआयशिवाय कोणताही चार्टर्ड अकाउंटंट टिकूच शकत नाही. नोकरी वा स्वतःची प्रॅक्टिस, एआय आता अनिवार्य आहे. सध्या एआय, डेटा अ‍ॅनालिटिक्स, ईएसजी आणि सस्टेनेबिलिटी यांसारखे विषय सीए अभ्यासक्रमाचा भाग नाहीत.
प्रसन्न कुमार डी., अध्यक्ष, आयसीएआय

Mumbai Hit-and-Run : मिठीबाई कॉलेजजवळ भरधाव दुचाकीची १५ वर्षीय मुलीला धडक; चालक फरार, CCTV फुटेज व्हायरल

ऑटो एलपीजी वाहन वयोमर्यादा वाढवा; उद्योग संघटनेची केंद्र सरकारकडे मागणी

अपात्रतेचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्याला नाही! सहकारी बँक संचालक कालमर्यादेबाबत बँकतज्ज्ञांचे मत

तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, ९ कामगार जखमी, Video

सणासुदीत साखर कडू! दर ७० रुपये किलोवर, गूळही महागला; महिन्यात २० रुपयांनी वाढ, शेवया-बत्ताशांचे भावही वाढले