इंडिया आघाडीची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

इंडिया आघाडीची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक

निवडणूक आयोगाचा (ईसी) कारभार आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यांवर आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी विरोधी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची ३० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाचा (ईसी) कारभार आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यांवर आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी विरोधी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची ३० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एसआयआर प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत मतभेदांच्या बातम्या समोर आल्यानंतर विरोधी पक्षांमधील समन्वय अधिक वाढला आहे. याप्रकरणी संयुक्त भूमिका घेण्याबाबत सर्व पक्ष एकमेकांच्या संपर्कात असून, सर्वसमावेशक रणनीती आखली जात आहे.

हकालपट्टीची मागणी

माकप, भाकप आणि भाकप (माले) लिब्रेशन या डाव्या पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची आणि एसआयआर प्रक्रिया तातडीने स्थगित करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, काँग्रेसनेही मुख्य निवडणूक आयुक्तांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. या विषयावर पुढील रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस कार्य समितीची बैठक २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

महाभियोगाची तयारी

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांत पुन्हा एकदा हकालपट्टीचा (महाभियोग) प्रस्ताव दाखल करण्याच्या तयारीत विरोधक आहेत. कायदेशीर तज्ज्ञांकडून पडताळणी केल्यानंतर हा प्रस्ताव सादर केला जाईल. विरोधकांचा हा असा तिसरा प्रयत्न असेल.

नेत्यांना नजरकैदेत ठेवले जात असल्याचा ममतांचा आरोप

कोलकाता: आपल्या पक्षाच्या नेत्यांना नजरकैदे ठेवण्यात येत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केला. श्रीरामपूर येथील पक्षाच्या सभेला जाण्यापासून रोखण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मार्ग अडवला असल्याचे त्या म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, त्यांना सभेच्या ठिकाणी जाण्यापासून रोखले जात आहे. तसेच भाजप सरकार आणि पोलीस प्रशासन तृणमूलच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांकडे जाणीवपूर्वक "दुर्लक्ष" करत असल्याचा घणाघात त्यांनी केला. "आम्हाला गृहनजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मला सभेच्या ठिकाणी जाऊ दिले जात नाहीये. पण मी तेथे जाणारच आणि सभेला संबोधित करणारच. ताकद असेल तर मला थांबवून दाखवा, असा थेट इशारा देत ममता सभेच्या ठिकाणाकडे रवाना झाल्या.

श्रीरामपूरकडे जाणाऱ्या तृणमूल नेत्यांवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, "भाजपच्या गुंडांनी सभेच्या मार्गावर ताबा मिळवला आहे आणि तेथे पोलीस बंदोबस्त अजिबात नाही. न्यायालयाच्या परवानगीनेच ही सभा आयोजित केली आहे. त्यामुळे ती सुरळीत पार पाडणे ही पोलीस आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु पोलीस पूर्णपणे डोळेझाक करत आहेत.

विरोधी पक्ष एकाच मंचावर

निवडणूक आयोगाच्या या मुद्द्यावरून पश्चिम बंगालमधील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेले तृणमूल काँग्रेस आणि माकप हे दोन्ही पक्ष एकाच भूमिकेवर एकत्र आले आहेत. माकपचे सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी 'इंडिया' ब्लॉक आणि इतर विरोधी नेत्यांशी बैठकीबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही संवाद साधला. यावर, सद्यस्थिती पाहता सर्व पक्षांनी एकत्रितपणे कारवाई करण्याची गरज आहे, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

२६५ तालुक्यांत दुष्काळ; ७४ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत; कर्जवसुलीला स्थगिती, परीक्षा शुल्क माफ, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

निवडणूक आयोगाचा सारवासारवीचा प्रयत्न; SIR चे सर्व निर्णय सर्वानुमते

बाप्पा...पुढच्या वर्षी लवकर या! १२ दिवसांच्या ३६ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन; गुलालाची उधळण, ढोल-ताशांच्या गजराने मुंबई दुमदुमली

आजचे राशिभविष्य, २७ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

डाएटवाल्यांसाठी खास! नाश्त्यात बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की; १० मिनिटांत होईल तयार