'इंडिया' आघाडीची आज महारॅली X - IANS
राष्ट्रीय

'इंडिया' आघाडीची आज महारॅली

निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीतील कथित गैरव्यवहार आणि मतदानाच्या अधिकार आदीच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रणीत 'इंडिया' आघाडीने येथील रामलीला मैदानावर आज (१ नोव्हेंबर) महारॅली आयोजित केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीतील कथित गैरव्यवहार आणि मतदानाच्या अधिकार आदीच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रणीत 'इंडिया' आघाडीने येथील रामलीला मैदानावर आज (१ नोव्हेंबर) महारॅली आयोजित केली आहे. या महारॅलीत १० लाखांहून अधिक जण सहभागी होण्याचा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे.

दिल्लीत इंडिया आघाडीच्या सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, असा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी व्यक्त केला. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या सभेला उपस्थित राहण्यासाठी राजधानी दिल्लीत येत असल्याचा दावा त्यांनी केला.

सभेच्या तयारीबाबत वेणुगोपाल म्हणाले की, अनेक अडचणी असतानाही विरोधक ही सभा यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध आहेत. काहीही झाले, कितीही अडचणी आल्या तरी दिल्लीने आजवर पाहिलेल्या सर्वात मोठ्या सभांपैकी ही एक सभा ठरणार आहे. संपूर्ण देश उद्या दिल्लीत येत आहे."

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nashik : सिंहस्थ कुंभपर्वाला शानदार प्रारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण, २१ महिने चालणार सिंहस्थ कुंभमेळा

विदेशापेक्षा देशी विमान प्रवास महागला; मुंबई-दिल्ली विमान भाडे २६,५६०, मुंबई-लंडन २५,५०० रुपये

नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, १ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

दिवाळीच्या फराळात गोड पदार्थ खाऊन कंटाळलात? ही तिखट शंकरपाळ्यांची रेसिपी एकदा पाहाच