मोदी-ट्रम्प संभाषणात मस्क यांचा सहभाग असल्याचा दावा भारताने फेटाळला 
राष्ट्रीय

मोदी-ट्रम्प संभाषणात मस्क यांचा सहभाग असल्याचा दावा भारताने फेटाळला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात या आठवड्याच्या सुरुवातीला दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात अब्जाधीश एलन मस्क यांचाही सहभाग असल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता तो भारताने शनिवारी स्पष्टपणे फेटाळून लावला.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात या आठवड्याच्या सुरुवातीला दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात अब्जाधीश एलन मस्क यांचाही सहभाग असल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता तो भारताने शनिवारी स्पष्टपणे फेटाळून लावला.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी स्पष्ट केले की, मंगळवारी झालेले हे संभाषण केवळ दोन नेत्यांमध्येच झाले होते. अमेरिकेतील एका आघाडीच्या वृत्तपत्राने अज्ञात अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले होते की, मस्क यांनी ट्रम्प आणि मोदी यांच्यातील संभाषणात सहभाग घेतला होता. दोन देशांच्या प्रमुखांमधील संभाषणात एका खासगी नागरिकाची उपस्थिती ही "असामान्य" असल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले होते.

यावर प्रतिक्रिया देताना जैस्वाल म्हणाले की, आम्ही ते वृत्त पाहिले आहे. २४ मार्च रोजी झालेले संभाषण केवळ मोदी आणि ट्रम्प यांच्यातच झाले होते.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन