सोने हव्यास आटला! भारतीयांची सोने मागणी ६ टक्क्यांनी कमी  (संग्रहित छायाचित्र - FPJ)
राष्ट्रीय

सोने हव्यास आटला! भारतीयांची सोने मागणी ६ टक्क्यांनी कमी

कमकुवत हंगामी विक्री, वाढलेले कस्टम्स (आयात) शुल्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोन्याची खरेदी कमी करण्याचे आवाहन, यामुळे एप्रिल-जून या दुसऱ्या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी वर्षागणिक ६ टक्क्यांनी घटून १३१.४ टनांवर आली आहे, अशी माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात देण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : कमकुवत हंगामी विक्री, वाढलेले कस्टम्स (आयात) शुल्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोन्याची खरेदी कमी करण्याचे आवाहन, यामुळे एप्रिल-जून या दुसऱ्या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी वर्षागणिक ६ टक्क्यांनी घटून १३१.४ टनांवर आली आहे, अशी माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात देण्यात आली आहे.

डब्ल्यूजीसीच्या ‘२०२६ च्या दुसऱ्या तिमाहीतील गोल्ड डिमांड ट्रेंड्स’ अहवालानुसार, गेल्या वर्षी याच कालावधीत सोन्याची एकूण मागणी १३९.७ टन इतकी होती.

या घसरणीबाबत डब्ल्यूजीसीचे भारतातील प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी पीटीआयला सांगितले, प्रमाणाचा विचार केला तर मागणी घटली आहे, परंतु मूल्याच्या बाबतीत हा एक नवा विक्रम ठरला आहे. या तिमाहीत सोन्याचा एकूण वापर ₹ १,९८,१०० कोटी झाला आहे, जो २०२५ मधील याच कालावधीतील ₹ १,३२,५०० कोटींच्या तुलनेत ५० टक्क्यांनी जास्त आहे. यावरून स्पष्ट होते की, सोन्याचे भाव उच्च स्तरावर असूनही ग्राहक सोन्यालाच पहिले प्राधान्य देत आहेत.

चालू वर्षातील सोन्याच्या मागणीबाबत डब्ल्यूजीसीने ६५० ते ७५० टन मागणी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

दागिन्यांच्या मागणीला फटका, तस्करी वाढण्याची चिंता...

  • पंतप्रधानांचे आवाहन : देशाचे वाढते आयात बिल आणि कच्च्या तेलाच्या अस्थिर किमतींच्या पार्श्वभूमीवर परकीय चलनाची बचत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी चालू वर्षाच्या मे महिन्यात नागरिकांना सोन्याची बिगर-आवश्यक खरेदी कमी करण्याचे आवाहन केले होते.

  • बेकायदेशीर बाजाराची भीती : आयात शुल्कातील वाढीमुळे काळ्या बाजारात (तस्करीच्या) सोन्याची आवक वाढल्याबद्दल सचिन जैन यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, तस्करी आणि बेकायदेशीर सोने बाजारात येणे हा या उद्योगापुढील सर्वात मोठा धोका आहे. याचे अहवाल आधीच मिळू लागले आहेत आणि येत्या तिमाहींमध्ये आम्ही यावर बारीक लक्ष ठेवून असू.

जागतिक सोने मागणी स्थिर; जून तिमाहीत मौल्यवान धातू खरेदी १,२६९ टनांवर

मुंबई : वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालानुसार, एप्रिल-जून तिमाहीत सोन्याची जागतिक मागणी १,२६९ टनांवर वर्षागणिक स्थिर राहिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतींनी उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत दरांमध्ये काही प्रमाणात घसरण आणि स्थिरता दिसून आली.

डब्ल्यूजीसीच्या २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत गोल्ड डिमांड ट्रेंड्स अहवालानुसार, गेल्या वर्षी (२०२५) याच तिमाहीत पिवळ्या धातूची एकूण जागतिक मागणी १,२६८.६ टन होती.

  • एकूण जागतिक मागणी : १,२६९ टन (स्थिर)

  • पहिल्या सहामाहीतील एकूण मागणी : २,५२२ टन (२% वाढ, मूल्य: $३८० अब्ज)

  • मध्यवर्ती बँकांची खरेदी : २८९ टन (६२% ची वाढ)

  • आरबीआयची खरेदी : एप्रिल-जून तिमाहीत २०० किलो

  • दागिन्यांची मागणी : १५% घसरण (किमती उच्च राहिल्याने घट)

  • गुंतवणूक मागणी : २६२ टन (कमी किमतींमुळे मंदावली)

  • एकूण सोन्याचा पुरवठा : १,२६९ टन (बदल नाही)

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : वांद्रे-खार उड्डाणपुलाची ४५ दिवसांत पुनर्बांधणी; पश्चिम रेल्वेचा निर्णय; हार्बर मार्गावर ४५ दिवसांचा मेगाब्लॉक

लग्न न जमल्याने २९ युवकांची आत्महत्या; जळगाव जिल्ह्यात सहा महिन्यांत ४४३ आत्महत्यांची नोंद

शाळांमधील उपाहारगृहांसमोर खाद्ययादीचा पेच; जंक फूड नियमांमुळे शाळांबाहेरील स्टॉलवर संक्रांत

Mumbai : उच्च न्यायालयातील कॅन्टिनवर FDA चा बडगा; FSSAI परवाना नसल्याचे उघड