सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी जम्मूमध्ये मुसळधार पावसामुळे पुलाचा काही भाग खराब झाला.  छायाचित्र : पीटीआय
राष्ट्रीय

भारताची माणुसकी! संभाव्य पुराबाबत पाकिस्तानला दिला सतर्कतेचा इशारा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार निलंबित असतानाही ही माहिती पोहोचवण्यात आली.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला तावी नदीतील पूरस्थितीबाबत मानवतेच्या आधारावर इशारा दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार निलंबित असतानाही ही माहिती पोहोचवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडे दिली. त्यानंतर ती पाकपर्यंत पोहोचवण्यात आली, असे जलशक्ती मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. सिंधु करार निलंबित होण्यापूर्वी भारत हा पाकिस्तानसोबत अशा माहितीची देवाणघेवाण करत असे. मात्र, या वेळी हे पाऊल केवळ मानवी आधारावर उचलण्यात आले,” असे सूत्रांनी स्पष्ट केले. तावी नदीचा उगम हिमालयात होऊन ती जम्मू विभागातून वाहत जाऊन पाकिस्तानमधील चिनाब नदीला मिळते.

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे सीमापार दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा पर्यटकांचा, मृत्यू झाला होता. तेव्हापासून भारत-पाकचे संबंध कमालीचे ताणले असून भारताने दशकांपासून अस्तित्वात असलेला सिंधू जल करार निलंबित केला आहे. सिंधू जल कराराद्वारे १९६० पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू नदी व तिच्या उपनद्यांच्या वापराबाबत नियम घालण्यात आले होते.

राज्यभर पुन्हा मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर पावसाचे सावट

आझाद मैदानात उपोषण करण्यास HC ची मनाई; पण जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम; म्हणाले - "कोर्ट आम्हाला १०० टक्के...

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटलांना हायकोर्टाचा धक्का; परवानगीशिवाय आझाद मैदानात उपोषणास मनाई

'या रीलमध्ये चुकीचं काय?' रोहित पवारांकडून अथर्व सुदामेची पाठराखण; 'तो' व्हिडिओही पुन्हा केला शेअर

विवाहित लेकीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पकडले; बापाने दोघांनाही विहिरीत ढकलून संपवले, धक्कादायक घटनेने नांदेड हादरले