संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

सुरक्षा यंत्रणेचे ‘मॉक ड्रिल’ घ्या; गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिकच ताणले गेलेले असताना केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी सर्व राज्यांना ७ मे रोजी सुरक्षा यंत्रणेचे ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश दिले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिकच ताणले गेलेले असताना केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी सर्व राज्यांना ७ मे रोजी सुरक्षा यंत्रणेचे ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश दिले आहेत.

या ‘मॉक ड्रिल’अंतर्गत राज्यांतील आपत्कालीन व्यवस्था भोंगे (सायरन) वाजवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. प्रत्येक राज्यातील सुरक्षा यंत्रणा तपासा, त्या सुसज्ज ठेवा, यासाठी हे ‘मॉक ड्रिल’चे आदेश देण्यात आलेले आहेत. याशिवाय, राज्यांना हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन बसविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हवाई हल्ल्याच्या सायरनच्या बाबतीत विद्यार्थी आणि नागरिकांना बचावकार्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

सायरनद्वारे हवाई हल्ल्याचा इशारा जारी केला जाईल, शत्रूच्या हल्ल्याच्या बाबतीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूंवर सामान्य नागरिक आणि विद्यार्थी इत्यादींना प्रशिक्षण दिले जाईल, क्रॅश ब्लॅक आऊट उपायांची तरतूद, निर्वासन योजनेचे अद्ययावतीकरण आणि सराव. दहशतवादाविरोधातील भारताच्या लढाईला अनेक देशांचा पाठिंबा मिळत असून त्यामध्ये आता रशियाचीही भर पडली आहे. जपाननेही भारताला पाठिंबा दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली.

भारताची एडीबीकडे मागणी

भारत पाकिस्तानच्या विविध स्तरावर मुसक्या आवळत असून आता भारताने पाकविरोधात आणखी एक पाऊल उचलत जागतिक स्तरावर पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) अध्यक्षांची भेट घेतली आणि पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या निधीत कपात करण्याची मागणी केल्याचे वृत्त आहे.

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

दहशतवाद्यांना मदत आणि आश्रय देण्याचा आरोप असलेल्या इम्तियाज अहमद या युवकाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली असता तो वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सध्या या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

पूंछमध्ये जेवणाच्या डब्यात स्फोटके

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कर आणि तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या लपण्याच्या जागा आणि छुपे तळ शोधून काढण्यासाठी व्यापक शोधमोहीम हाती घेतली असताना सूरनकोट परिसरात दहशतवाद्यांचा एक तळ सापडला असून तेथे जेवणाच्या डब्यात स्फोटके लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले. यावेळी काही ठिकाणी लष्कराची दहशतवाद्यांशी चकमक झाल्याचे समोर आले आहे. अशाच एका मोहिमेमध्ये सुरक्षा दलांनी पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या एका तळावर हल्ला चढवला. या हल्ल्यात हा तळ उद्ध्वस्त झाला असून तेथे मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

Maharashtra HSC Result 2026 : आज बारावीचा निकाल लागणार; ऑनलाईन चेक करा एका क्लिकवर, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

जनगणना दोन टप्प्यात! नागरिकांनी डिजिटल पद्धतीने स्व-गणना करावी; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘जनगणना-२०२७’चा शुभारंभ

Mumbai : ‘नीट’ परीक्षेमुळे मध्य रेल्वेचा रविवारचा ब्लॉक रद्द; शनिवारी मेगाब्लॉक, रात्री ११.१६ वाजता CSMTहून शेवटची लोकल

Pune : सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ४ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; हत्या करुन शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला मृतदेह

Mumbai : पालिकेचे ३ कर्मचारी गंभीर जखमी; पवईत गटार साफ करताना अंगावरून टेम्पो गेल्याची धक्कादायक घटना