संग्रहित छायाचित्र पीटीआय
राष्ट्रीय

तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल; आर्थिक हिताबाबत सतर्कता गरजेची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पष्ट प्रतिपादन

भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकावर जाण्याच्या मार्गावर आहे. जगातील आर्थिक अस्थिरता व अनिश्चितेपुढे देशाच्या आर्थिक हिताबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Swapnil S

वाराणसी : भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकावर जाण्याच्या मार्गावर आहे. जगातील आर्थिक अस्थिरता व अनिश्चितेपुढे देशाच्या आर्थिक हिताबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणून संबोधले होते. तसेच भारतीय मालावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करून रशियन युद्ध सामग्री व तेल वापरल्यास दंडाची घोषणा केली. त्यावर पंतप्रधानांनी पहिल्यांदाच भाष्य केले.

वाराणसी मतदारसंघातील बनौली गावात झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी २ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन झाले. ते म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्था सध्या अस्थिरता व अनिश्चिततेच्या गर्तेत अडकली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरला पाहिजे. भारतीयांच्या कष्टाने बनलेल्या वस्तू खरेदी केल्या पाहिजे. प्रत्येक देश आपापल्या हितांचा विचार करत आहेत. भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनत आहे. त्यामुळे आपल्या आर्थिक हितांबाबत आपण सजग राहिले पाहिजे. शेतकरी, लघुउद्योग व रोजगार आदींचे हित पाहणे आपल्या सर्वोच्च प्राधान्यावर आहेत. सरकार त्या दिशेने प्रयत्न करत आहे, असे मोदी म्हणाले.

तीन कोटी लखपती दिदी बनवण्याचे लक्ष्य

आम्ही लखपती दिदी मोहीम राबवत आहोत. आमचे लक्ष्य तीन कोटी लखपती दिदी बनवण्याचे आहे. हा आकडा ऐकून सपावाले सायकल घेऊन पळून जातील. आतापर्यंत आम्ही दीड कोटी महिलांना लखपती दिदी बनवले आहे. सरकारने महिलांसाठी मोठे काम केले आहे, असे मोदी म्हणाले.

ब्रह्मोसच्या नावाने पाकिस्तानची झोप उडते

हा नवीन भारत असून तो भोलेनाथची पूजा करतो आणि देशाच्या शत्रूसाठी काळभैरव बनतो. 'ऑपरेशन सिंदूर 'मध्ये स्वदेशी शस्त्रास्त्रांची ताकद संपूर्ण जगाला दाखवून दिली. स्वदेशी क्षेपणास्त्र, ड्रोन व ब्रह्मोसने 'आत्मनिर्भर भारता'चे स्वप्न साकार केले. ब्रह्मोसचे नाव घेतल्यावर पाकिस्तानला झोपही येत नाही, असे ते म्हणाले. भारतावर जो हल्ला करेल तो पाताळात जाऊनही वाचू शकत नाही. आम्ही पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले हे काँग्रेसचे लोक पचवू शकत नाही. पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांची खांडोळी केली. पाकचे अनेक हवाई तळ आयसीयूत आहेत. पाकिस्तान दुःखी आहे हे समजू शकतो, पण काँग्रेस, सपाचे लोक दहशतवाद्यांची परिस्थिती बघून रडत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

बळीराजाला आधार, शेतीला नवी उभारी

आजचे राशिभविष्य, २८ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण