संग्रहित छायाचित्र  
राष्ट्रीय

ट्रम्प नरमले! अखेर भारत-अमेरिका व्यापार करार; टॅरिफ २५ वरून १८ टक्क्यांवर

बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अखेर नरमले असून त्यांनी भारतावरील टॅरिफ २५ वरून १८ टक्के करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. तसेच बहुप्रलंबित भारत-अमेरिका व्यापार करार झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Swapnil S

वॉशिंग्टन/नवी दिल्ली : बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अखेर नरमले असून त्यांनी भारतावरील टॅरिफ २५ वरून १८ टक्के करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. तसेच बहुप्रलंबित भारत-अमेरिका व्यापार करार झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेने भारतावर सातत्याने टॅरिफ लावून कोंडी केली होती. गेल्या वर्षभरापासून यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही देशांमध्ये व्यापार करार करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. सोमवारी रात्री उशिरा पंतप्रधान मोदींशी ट्रम्प यांनी फोनवर संवाद साधला. त्यानंतर अमेरिकेकडून टॅरिफ कपातीची घोषणा करण्यात आली.

भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. सध्या तरी चर्चेच्या मुद्द्यांबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दोन्ही देशात झालेल्या करारानुसार, भारत हा अमेरिकेकडून अधिकाधिक कच्चे तेल खरेदी करणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ट्रम्प यांनी जाहीर केले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत-अमेरिका संबंध, धोरणात्मक, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य, जागतिक परिस्थिती आणि परस्पर सहकार्याशी संबंधित मुद्द्यांवर लवकरच चर्चा होण्याची शक्यता आहे.

भारत अधिकाधिक कच्चे तेल खरेदी करणार

दोन्ही देशांत झालेल्या करारानुसार, भारत हा अमेरिकेकडून अधिकाधिक कच्चे तेल खरेदी करणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ट्रम्प यांनी जाहीर केले.

ट्रम्प यांनी भारताशी संबंधित फोटो केले पोस्ट

दरम्यान, ट्रम्प यांनी सोमवारी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडियावर भारताशी संबंधित दोन फोटो पोस्ट केले होते. एका फोटोत त्यांनी ‘इंडिया गेट’चा फोटो शेअर केला होता, तर दुसऱ्या फोटोत पंतप्रधान मोदींसोबत एका मासिकाचे मुखपृष्ठ शेअर केले होते. ट्रम्प यांनी ‘इंडिया गेट’चा फोटो शेअर करत लिहिले की, भारताचा ‘ट्रायम्फल आर्च’ खूप सुंदर आहे. ‘आपला वाला’ या सगळ्यांमध्ये सर्वात शानदार असेल!

Mumbai : वीकेंडला ट्रेनने प्रवास करताय? आधीच जाणून घ्या वेळापत्रक; उद्या 'या' मार्गावर २१ तासांचा मेगाब्लॉक

कुपोषणामुळे मृत्यूचे सत्र ही दुर्दैवी परिस्थिती; हायकोर्टाने सरकारला सुनावले खडे बोल

पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन; ‘अपघाती कुलगुरू हटवा, विद्यापीठ वाचवा’च्या घोषणा

वाहन परवान्याचा ‘सवलतीचा कालावधी’; मुदत समाप्तीनंतर महिन्याची सवलत प्रस्तावित

ठाण्याचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर; वाढत्या उन्हाने नागरिक हैराण, पुढील आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता