राष्ट्रीय

भारतीय नागरिकांना तातडीने इराण सोडण्याच्या सूचना

इराणमधील स्थिती गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण बनल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांपासून ते उद्योजकांपर्यंतच्या आपल्या सर्व नागरिकांना तातडीने इराण सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : इराणमधील स्थिती गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण बनल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांपासून ते उद्योजकांपर्यंतच्या आपल्या सर्व नागरिकांना तातडीने इराण सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनामुळे सध्या इराणमध्ये कमालीची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकारविरोधी आंदोलनादरम्यान हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच खामेनी यांनी अनेक आंदोलकांना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकाही इराणविरोधात कधीही लष्करी कारवाई सुरू करेल, असे दावे केले जात आहेत.

भारतीय दूतावासाने तेहरानमधून प्रसिद्ध केलेल्या या सूचनेमध्ये म्हटले आहे की, इराणमधील बदलती स्थिती पाहता सद्य:स्थितीत इराणमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांना प्राप्त असलेल्या वाहतुकीच्या कोणत्याही साधनाच्या माध्यमातून इराण सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार