बचावासाठी गेलेले कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर समुद्रात पडले; ३ क्रू मेंबर बेपत्ता, शोधमोहिम सुरू (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

अरबी समुद्रात मोठी दुर्घटना; बचावासाठी गेलेले कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर पडले; ३ क्रू मेंबर बेपत्ता, शोधमोहिम सुरू

हेलिकॉप्टरला सोमवारी रात्री उशीरा समुद्रात 'इमर्जन्सी लँडिंग' करावी लागली. यावेळी 'हार्ड लँडिंग' झाल्याने ही दुर्घटना घडली. त्यानंतर हेलिकॉप्टरमधील तीन क्रू मेंबर बेपत्ता झाले असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.

Swapnil S

भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर एका बचाव मोहिमेदरम्यान अरबी समुद्रात पडल्याचे समोर आले आहे. हेलिकॉप्टरला सोमवारी रात्री उशीरा समुद्रात 'इमर्जन्सी लँडिंग' करावी लागली. यावेळी 'हार्ड लँडिंग' झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे समजते. त्यानंतर हेलिकॉप्टरमधील चारपैकी तीन क्रू मेंबर बेपत्ता झाले असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील पोरबंदरपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या 'हरी लीला' या मोटार टँकरवरील जखमी क्रू मेंबरला सुखरूप बाहेर काढण्यासाठी सोमवारी रात्री उशीरा साधारण ११ वाजेच्या सुमारास हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले होते. हेलिकॉप्टर हरी लीलाजवळ पोहोचले असतानाच 'इमर्जन्सी हार्ड लँडिंग' करावे लागले.

भारतीय तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार, चार क्रू मेंबर्स असलेल्या अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (एएलएच)ला समुद्रात 'इमर्जन्सी हार्ड लँडिंग' करावे लागले आणि या आपत्कालीन परिस्थितीत ते समुद्रात पडले. आपत्कालीन लँडिंगच्या कारणाचा अद्याप शोध घेतला जात आहे. एका क्रू सदस्याला शोधण्यात यश आले आहे, तर उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. हेलिकॉप्टरचे लोकेशन सापडले आहे. या बचाव कार्यासाठी, बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या शोधासाठी ४ जहाजे आणि २ विमाने परिसरात तैनात केली आहेत.

आर्थिक स्थिती ठणठणीत! राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; हिवाळी अधिवेशनाची अखेर सांगता

नितीन नबीन ठरले भाजपचे ‘उपकर्णधार’! राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

बहुस्तरसत्ताक समाजातील शिक्षण प्रश्न

शेतकरी केंद्रित महसूल क्रांती!

आजचे राशिभविष्य, १५ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत