राष्ट्रीय

भारताचा विकसित राष्ट्र होण्याचा प्रवास लवकरच होणार - पीयूष गोयल

आपल्या मातृभूमीला परत देण्याच्या आपल्या कर्तव्याच्या भावनेने भारताच्या विकास गाथेमधील भागधारक असतील

वृत्तसंस्था

भारत आणि जगभरातील भारतीय समुदाय यांच्यातील भागीदारीमुळे भारताचा विकसित राष्ट्र होण्याचा प्रवास जलद मार्गी लावण्यास खरोखर मदत होईल. टियर २ आणि ३ शहरे तसेच दुर्गम भागात स्टार्टअप्सना मार्गदर्शन व समर्थन देण्यासाठी पालो अल्टोमध्ये सेतू सुरू करण्यात आली आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की,अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी ते लॉस एंजेलिसमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.

अमेरिकेमध्ये त्यांनी भारतीय समुदायातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांशी केलेल्या संवादाबद्दल बोलताना मंत्री म्हणाले की, त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत आणि अनेक सूचना केल्या ज्या वैचारिकदृष्ट्या महत्त्वाच्या होत्या. गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की, ते आपल्या मातृभूमीला परत देण्याच्या आपल्या कर्तव्याच्या भावनेने भारताच्या विकास गाथेमधील भागधारक असतील. भारतीय समुदायातले सदस्य सामान्यतः त्यांच्या निवडलेल्या व्यवसायात खूप यशस्वी असतात. त्यांच्यापैकी प्रत्येकाने अमेरिकेच्या लोकांमध्ये आणि अर्थव्यवस्थेत आपला ठसा उमटवला आहे.

२०४७ पर्यंत पॉवरहाउस

भारत २०४७ पर्यंत जागतिक विकासाला चालना देणारे पॉवरहाउस (शक्तिस्थान) बनण्याच्या मार्गावर आहे. २०४७मध्ये भारताची अर्थव्यवस्था ३५ ते ४५ लाख कोटी डॉलर्सची असेल आणि ती भारताला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत बसवेल, असे CII (भारतीय औद्योगिक महासंघ)चे अनुमान आहे, असे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियातल्या व्यावसायिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. मेळाव्याला संबोधित करताना गोयल यांनी सांगितले की, भारतात होत असलेल्या प्रगतिकारक सुधारणा आणि विकास कामांमुळे, देशाने जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा