X
राष्ट्रीय

आयपीएस अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अटक

कथित ३ कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दीपक गहलवत नावाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला अटक केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: कथित ३ कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दीपक गहलवत नावाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. हे अधिकारी सध्या नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो मध्ये सहसंचालक म्हणून कार्यरत होते. बनावट औषध निर्मिती रॅकेटच्या तपासाशी संबंधित हे प्रकरण असल्याचे समोर आले आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, पुद्दुचेरी येथील एका व्यावसायिकावर बनावट औषध निर्मिती प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू होता. या तपासात व्यावसायिकाला मदत करण्यासाठी आणि त्याच्या बाजूने निकाल लावण्यासाठी गहलवत यांनी लाचेची मागणी केली होती.

सीबीआयमधील अधिकाऱ्यांवर आपला प्रभाव असल्याचे सांगून त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने अधिकाऱ्याच्या संबंधित ठिकाणांवर छापे टाकून अनेक डिजिटल उपकरणे, हार्ड डिस्क आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण