photo : X (@DrSJaishankar)
राष्ट्रीय

दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणे गरजेचे; SCO च्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे ठाम प्रतिपादन

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे, असे ठोस प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले.

Swapnil S

बीजिंग : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे, असे ठोस प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले.

ते म्हणाले की, एससीओतील सदस्य देशांनी संघटनेच्या मूळ उद्देशाशी वचनबद्ध असले पाहिजे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेला हल्ला जम्मू-काश्मीरमधील पर्यटन अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी व धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी करण्यात आला. त्यात २६ जणांची हत्या केली. या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने निषेध केला. या हल्ल्यातील दोषींना, सूत्रधार व निधी पुरवणाऱ्यांना शिक्षा मिळालाी पाहिजे, असे परिषदेने म्हटले होते. एससीओची स्थापना दहशतवाद, फुटीरतावाद, मूलतत्त्ववादाचा नायनाट करण्यासाठी केली होती. त्यामुळे एससीओला दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.

सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती अस्थिर आहे. त्यामुळे क्षेत्रीय सहकार्य आवश्यक आहे. गेली काही वर्षे आम्ही अधिक संघर्ष, स्पर्धा, दबाव पाहिले आहेत. आर्थिक अस्थिरता स्पष्टपणे दिसत आहे. जागतिक व्यवस्था स्थिर राहण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. आपण सर्वजण मिळून समस्यांचा समाधान करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल