राष्ट्रीय

झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात सरासरी ६६.१८ टक्के मतदान

झारखंड विधानसभेच्या ८१ जागांपैकी बुधवारी पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी मतदान पार पडले. झारखंडमध्ये बुधवारी सरासरी ६६.१८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी लोहारदागा मतदारसंघात सर्वाधिक ७२.१९ टक्के तर सेरायकेला खर्सवान आणि घुमला या मतदारसंघात ६७.३५ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाने जारी

Swapnil S

रांची : झारखंड विधानसभेच्या ८१ जागांपैकी बुधवारी पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी मतदान पार पडले. झारखंडमध्ये बुधवारी सरासरी ६६.१८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी लोहारदागा मतदारसंघात सर्वाधिक ७२.१९ टक्के तर सेरायकेला खर्सवान आणि घुमला या मतदारसंघात ६७.३५ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाने जारी केली आहे.झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघात एकूण ६८३ उमेदवार रिंगणात उभे असून, त्यात ६०९ पुरुष आणि ७३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी १.१७ कोटी लोक मतदानासाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ६४.८६ टक्के मतदार निवडणुकीसाठी बाहेर पडले. आता दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ३८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, १० राज्यांमधील ३१ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ५५ ते ९० टक्के इतके मतदान झाले.

वायनाडमध्ये मतदान टक्केवारी घसरली

वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत बुधवारी ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वडेरा या पहिल्यांदाच निवडणुकीला उभ्या आहेत. एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ७४ टक्के इतके मतदान झाले होते. त्याचबरोबर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ८० टक्के इतके मतदान झाले होते. दोन्ही वेळेला वायनाडमधून राहुल गांधी निवडून आले होते. वायनाडमध्ये बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६४.६९ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

साताऱ्यात नऊ आमदारांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचा होणार 'करेक्ट कार्यक्रम' याकडे सर्वांच्या नजरा!

ठाण्यात महायुतीतील उमेदवारांचे टेन्शन वाढले?घटक पक्षांतील कार्यकर्त्यांनी प्रचाराला मारली दांडी

आता सत्ताधाऱ्यांची बॅग तपासणी; टीकेनंतर निवडणूक अधिकारी सक्रिय

शरद पवार यांचे छायाचित्र, व्हिडीओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश

मतदान टक्का वाढीसाठी भव्य ऑफर; मतदारांना खरेदी, खानपान आणि मनोरंजनातही मिळणार सवलत