अण्णामलाई भाजप सोडणार, नवा पक्ष काढणार PTI
राष्ट्रीय

अण्णामलाई भाजप सोडणार, नवा पक्ष काढणार

तमिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी भाजपमध्ये आपल्यासाठी कोणतीही संधी किंवा भविष्य उरलेले नाही, असे सांगत पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Swapnil S

चेन्नई : तमिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी भाजपमध्ये आपल्यासाठी कोणतीही संधी किंवा भविष्य उरलेले नाही, असे सांगत पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीनंतर ते आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळपास एक महिना झाला आहे. या निवडणुकीत २३४ सदस्यांच्या विधानसभेत भाजपला अवघी एक जागा जिंकता आली होती. या पार्श्वभूमीवर हा मोठा राजकीय भूकंप मानला जात आहे.

दिल्लीला जाण्यासाठी चेन्नई विमानतळावर पोहोचले असता पत्रकारांशी बोलताना अण्णामलाई म्हणाले, ‘कृपया थोडी प्रतीक्षा करा. आपण दोन दिवसांत एकत्र बसून यावर सविस्तर बोलू." विशेष बाब म्हणजे, ते ज्या गाडीने विमानतळावर आले, त्यावर भाजपचा झेंडा लावलेला नव्हता.

CJP Protest : आंदोलन होणार तीव्र; झुरळांचा इशारा, ‘इंडिया’ आघाडीसह सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन

‘इंडिया’ आघाडीचा आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; राहुल गांधींनी दिली माहिती

Delhi Protest : शांततापूर्ण आंदोलनांवर कारवाई नको; सर्वोच्च न्यायालयाची तंबी, मेट्रो, इंटरनेट सेवा पूर्ववत करा

दुष्काळग्रस्तांसाठी पुढील सहा ते आठ महिन्यांचे नियोजन करा; केंद्रीय पथकांसोबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

CJP Protest : मुंबईत आंदोलकांची धरपकड; अंजली दमानियांसह शेकडो आंदोलकांना घेतले ताब्यात