कर्नाटकात ४५ मोरांचा मृत्यू; विषाणूंचा प्रादुर्भाव, कोंबड्यांचे मांसही शिजवून खाण्याचा सल्ला 
राष्ट्रीय

कर्नाटकात ४५ मोरांचा मृत्यू; विषाणूंचा प्रादुर्भाव, कोंबड्यांचे मांसही शिजवून खाण्याचा सल्ला

कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात एच५एन१ या विषाणूच्या संसर्गामुळे सुमारे ४५ मोरांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायम माहिती उपायुक्त शुभा कल्याण यांनी दिली आहे.

Swapnil S

तुमकूर : कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात एच५एन१ या विषाणूच्या संसर्गामुळे सुमारे ४५ मोरांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायम माहिती उपायुक्त शुभा कल्याण यांनी दिली आहे. या घटनेच्या मुख्य केंद्रापासून (एपिसेंटर) किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित १० क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या भागात आता रॅपिड रिस्पॉन्स टीम्सद्वारे सतत देखरेख केली जात असून येथील ३१ पोल्ट्री दुकाने आणि १० पोल्ट्री फार्म्समधील पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

उपायुक्त शुभा कल्याण यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, तुमकूरमध्ये मोरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नमुने तपासणीसाठी पाठवले होते. अहवालात एच५एन१ विषाणूची उपस्थिती असल्याचे निश्चित झाले आहे. लोकांनी कोणतेही मांस केवळ चांगले शिजवलेल्या आणि उकडलेल्या स्वरुपातच खावे. जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे, असे त्या म्हणाल्या.

उद्याची TET रद्द; पेपरफुटीच्या संशयावरून राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय, भिवंडीत तिघांना अटक

फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले

५२ वर्षांनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? मुंबईत समुद्रकिनारी सहा मजली नव्या घराची तयारी

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

अचानक झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने दुचाकीस्वार कोमात, घटना सीसीटीव्हीत कैद